Tuesday 22 September 2020

DIO BULDANA NEWS 22.9.2020

 कोरोना अलर्ट : प्राप्त 554 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 129 पॉझिटिव्ह

  • 176 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.22 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 683 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 554 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 129 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 115 व रॅपिड टेस्टमधील 14 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 421 तर रॅपिड टेस्टमधील 133 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 554 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 16, खामगांव तालुका : टेंभुर्णा 1, आंबेटाकळी 3,   नांदुरा तालुका : बेलोरा 1, येरळी 1, जळगांव जामोद शहर : 4, मोताळा तालुका : कोथळी 1, लोणार तालुका: वडगांव 1,चिखली शहर : 8,चिखली तालुका : मेरा खु 1, ब्रम्हपूरी 7, हिमळ 1, शिंदी हराळी 1, अंबाशी 2, पेठ 1, बुलडाणा शहर : 17, मलकापूर तालुका : धरणगांव 1, दाताळा 2, मलकापूर शहर : 12, शेगांव शहर : 2,सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 3, सावखेड नजीक 2, तडेगांव 1, जळगांव जामोद तालुका : गाडेगांव 1, दे. राजा शहर : 6, मेहकर तालुका :हिवरा आश्रम 1, दे. राजा तालुका : गिरोली 1, दे. धनगर 1, निमखेड 1, दे. मही 2, धोत्रा 1, बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, धाड 2, देऊळघट 1, मेहकर शहर : 7, नांदुरा शहर : 13, मूळ पत्ता रिसोड जि वाशिम 1, परतवाडा जि. अमरावती 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 129 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान 58 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

      तसेच आज 176 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

कोविड केअर सेंटर नुसार सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  खामगांव : 49, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 17, अपंग महाविद्यालय 2, शेगांव : 15, दे. राजा : 27, चिखली : 20, मेहकर : 5, मलकापूर : 5, लोणार : 4, संग्रामपूर : 1, जळगांव जामोद : 10, नांदुरा : 8,सिं. राजा : 13.

   तसेच आजपर्यंत 27045 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4900 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4900 आहे. 

  आज रोजी 1202 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 27045 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 6080 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4900 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1104 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 76 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

*****

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे ऑनलाईन आयोजन

  • उमेदवारांनी आपल्या सेवायोजन कार्डाचा लॉग ईन आयडीतून अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका)दि.22 जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकासरोजगार उद्योजता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाईन पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन 27 ते 30 सप्टेंबर 2020 या कालावधीत करण्यात आले आहे.  सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज या www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर भरावे.

        या ऑनलाईन मेळाव्यात नामांकित खाजगी उद्योजक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित राहून 200 पेक्षा अधिक पदासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया राबविणार आहे. या भरतीमध्ये पात्र पुरुषमहिला उमेदवारांच्या ऑनलाईन मुलाखती घेण्यात येतील व पात्र उमेदवारांची निवड करण्यात येईल. तसेच उमेदवारांनी नांव नोंदणी केलेल्या दहावीबारावीपदवीनर्सिग पदविका, (ए.

एन. एम.जी. एन. एस.) आय. टी. आय. पासपदव्युत्तर पुरुषमहिला उमेदवारांनी आपले सेवायोजन कार्डचा आयडी व पासवर्डचा वापर करुन ऑनलाईन आपले लॉगईन मधुन ऑनलाईन अर्ज करुन सहभाग नोंदणी करुन रोजगार प्राप्त करावा.

रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार जेथे असतील त्याच ठिकाणावरुन आपल्या सेवायोजन कार्डचा युझर व पासवर्ड चा वापर करुन आपल्या लॉगइन मधुन ऑनलाईन रोजगार मेळाव्यात ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊ शकतात. पात्र असलेल्या पुरुषमहिला उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एका पेक्षा जास्त पदाकरिता सुध्दा ऑनलाईन अर्ज करु शकतात. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करतांना काही अडचण आल्यास जिल्हा कौशलय विकासरोजगारउद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावाअसे आवाहन सहाय्यक आयुक्तजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

******

आयटीआय प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीआधी ऑनलाईन दुरूस्ती करण्याची संधी

बुलडाणा,(जिमाका)दि.22 औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रवेश मिळण्यासाठी ऑगस्ट 2020 मध्ये अर्ज केलेल्या मात्र अर्ज करतांना झालेल्या चुकामुळे पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश नाकारलेल्या उमेदवारांना दुसऱ्या प्रवेश फेरीच्या पुर्वी अर्जात ऑनलाईन दुरुस्ती करण्याची संधी देण्यात येत आहे. ही सुविधा दि. 20 सप्टेंबर 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यत संचालनालया कडून देण्यात आलेली आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी आपले लॉगीनमध्ये admission activity – Grievances redressal / edit application form मध्ये जावून अर्जात दुरुस्ती करावी अथवा माहितीसाठी जवळच्या औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत किंवा हेल्पलाईनवर संपर्क करावाअसे आवाहन ऑद्योगीक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य पी. के. खुळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

                                                                                ****************

No comments:

Post a Comment