Monday 14 September 2020

DIO BULDANA NEWS 14.9.2020

 जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीमध्ये अशासकीय स्वयंसेवी प्रतिनिधींची निवड

·        अल्पसंख्यांकासाठी काम करणाऱ्या संस्थांनी अर्ज करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : अल्पसंख्याकाच्या कल्याणाकरीता पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ‍जिल्ह्यातंर्गत अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या 3 नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींची सदस्य म्हणून निवडीसाठी शासनास  शिफारस  करावयाची आहे.  तरी जिल्ह्यातील नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्था जे अल्पसंख्याका साठी काम करतात, अशा संस्थांनी आपला अर्ज किंवा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह अल्पसंख्याक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे 18 सप्टेंबर 2020 रोजी सायं 5 वाजेपर्यंत सादर करावे. या समितीवर अल्पसंख्यांका साठी काम करणाऱ्या 3 संस्थांच्या प्रतिनिधींना कोणतेही मानधन व बैठक भत्ता देय राहणार नाही. या अटीच्या अधिन राहून अर्ज सादर करावयाचे आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून  कळविण्यात आले आहे.  

*********

                         प्रतिशिधापत्रिका नोव्हेंबर पर्यंत एक किलो चनाडाळ मोफत मिळणार

  •  जिल्ह्यासाठी प्रतीमाह 430 मे.टन नियतन मंजूर
  • गोदाम निहाय वाहतूक करण्याचे आदेश

बुलडाणा,(जिमाका) दि.14 :  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत माहे जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीसाठी  प्रतिशिधापत्रिका प्रति माह 1 किलो चनाडाळ मोफत देण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंब लाभार्थ्यांना प्रतिशिधापत्रिका प्रतिमाह एक किलो चणाडाळ वितरित करावयाची आहे. या कालावधीसाठी जिल्ह्याला प्रतिमाह 430 मे. टन नियतन शासनाने मंजूर केले आहे. तसेच या डाळीचे नियतनाची जिल्ह्यातील विविध गोदामात वाहतुक करणेबाबत आदेश देण्यात येत आहे.

    शासन निर्णयातील निर्देशानुसार मे. श्री. सप्तश्रृंगी कंपनीने ही वाहतूक करावयाची आहे. गोदामनिहाय वाहतूक करावयाची सप्टेंबर महिन्यासाठी असलेली चनाडाळ  : बुलडाणा 4‍65 क्विंटल, ‍चिखली 339, अमडापूर 129, दे. राजा 208, मेहकर 310, डोणगांव 112, लोणार 263, सिंदखेड राजा 184, साखरखेर्डा 111, मलकापूर 294, मोताळा 312, नांदुरा 334, खामगांव 412, शेगांव 246, जळगांव जामोद 290 व संग्रामपूर 291 क्विंटल अशाप्रकारे एकूण 4300 क्विंटल चना डाळीची वाहतूक करावयाची आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

                                                            *******

प्रकल्पांमधील पिण्याच्या पाण्याचे आरक्षणासाठी 21 सप्टेंबरपर्यंत मागणी सादर करावी

  • बुलडाणा पाटबंधारे विभागाचे आवाहन   

बुलडाणा,(जिमाका) दि.14 :  बुलडाणा जिल्हा पाणी आरक्षण समितीची सभा मा. पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा पाणी आरक्षण समिती, तसेच  समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधीकारी यांचे प्रमुख  उपस्थितीत 5 ऑक्टोंबर ते 15 ऑक्टोंबर 2020 दरम्यान  आयोजित  करण्यात येणार आहे. त्यानुसार बुलडाणा पाटबंधारे  विभागाकडील प्रकल्पांवरून पिण्याचे पाणी आरक्षणाची मागणी  नोंदविण्यात येत आहे. सर्व नगर परिषदा / महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पंचायत समिती / संबंधित ग्रामपंचायत यांनी कार्यकारी  अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग, बुलडाणा यांचेकडे 21 सप्टेंबर 2020 पुर्वी न चुकता पाणी मागणी सादर करावी. जेणेकरून जिल्हा पाणी आरक्षण समितीच्या सभेमध्ये सदर मागणी उपस्थीत करणे शक्य होईल. सदर सभेमध्ये प्रकल्पांमधील उपलब्ध पाणी साठ्यानुसार पिण्याच्या पाण्याचे आरक्षणास मंजूरी देण्यात येणार आहे. याची सर्व संबंधीत बिगर सिंचन आरक्षण करणाऱ्या संस्थांनी नोंद घ्यावी. प्रतीक्षा न करता पाणी मागणी तात्काळ सादर करावी,  असे आवाहन कार्यकारी अभियंता, बुलडाणा पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.

                                                            ******

                          एस.टी ची शिवशाही, आंतरराज्य बससेवा सुरू

  • आरक्षणासाठी www.msrtc.gov.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा   

बुलडाणा,(जिमाका) दि.14 :  राज्य परीवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागातंर्गत  आंतरजिल्हा, आंतर राज्य व शिवशाही  नवीन बस वाहतुक आजपासून सुरू करण्यात आली आहे. सदर वाहतुक प्रति बस 50 टक्के आसन क्षमतेने प्रवाशांना बसमध्ये प्रचलित दराने प्रवास करता येईल. तसेच प्रत्येक प्रवाशास मास्क घालणे बंधनकारक राहील. चालविण्यात येणाऱ्या बसेस ह्या पुर्णत: निर्जंतुकीकरण करून चालविण्यात येत आहेत. तसेच प्रवाशांची गर्दी वाढल्यास आवश्यकतेनुसार फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. प्रवासादरम्यान प्रवाशांनी योग्य ती दक्षता घ्यावी.प्रवाशांना बसमध्ये आरक्षणासाठी www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी या सुवीधेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक यांनी केले आहे.

                बसेसचे वेळापत्रक : बुलडाणा आगारातून सकाळी 9 वा. शिवशाही नागपूर, अमरावती सकाळी 10.15 वा, लातूर स 8.30 वा, पुणे स 9.15 वा शिवशाही,  यवतमाळ दु 3.30 वा, धुळे स 7.15 वा, परतवाडा दु. 1 वा, बऱ्हाणपूर सकाळी 7.20 व 11 वाजता. ‍चिखली आगार : जळगांव खां सकाळी 6.15, 11.45 वा, पुणे  शिवशाही सायं 6.30 वा, त्र्यंबकेश्‌वर स 9.30 वा,  शिर्डी स 6 वा, बऱ्हाणपूर सकाळी 9 व 11 वाजता, खामगांव आगार : अकोला  शिवशाही, नाशिक स 9.45 वा,  शिर्डी स 6.15, 7.05 व 9.45 वा, नांदुरी गड (सप्तश्रृंगी गड) स 8.30 वा, औरंगाबाद स 9.30 वा, मेहकर आगार : त्र्यंबकेश्वर स. 7 वा, जळगांव खां सकाळी 9 व 10 वाजता, अकोला स. 6.30 वाजता, मलकापूर आगार : अहमदपूर सकाळी 9 वा, वझर सरकटे स. 8.45 वा, सोलापूर स 7.45 वा, पुणे सायं 6.30 वाजता, जळगांव जामोद अगार : पुणे सकाळी 9.15 वा, औरंगाबाद स. 5.30, दु. 2.30 वा, बऱ्हाणपूर स 7.05, दु. 1.50 वाजता, शेगांव आगार : अकोला स. 9.30 वाजता शिवशाही, चंद्रपूर स 9 वा,  शिर्डी  स 9.15 वा, पंढरपूर स 7.30 वा, औरंगाबाद स 6.15 व 8.30 वाजता, बऱ्हाणपूर दु. 4.15 वाजता.  

****** 

कोरोना अलर्ट : प्राप्त 295 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 85 पॉझिटिव्ह

  • 118 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका) दि.14: प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 380 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 295 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 85 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 68 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 154 तर रॅपिड टेस्टमधील 141 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 295 अहवाल निगेटीव्ह आहेत.

     पॉझीटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : अमृत नगर 1, ईश्वर नगर 1, नटराज गार्डन 2, सिवील लाईन 1, केशव नगर 1, आठवडी बाजार 2, पंजाब ले आऊट 1,  नांदुरा शहर : वार्ड नं एकवीस 1,  मलकापूर शहर : 5, पारपेट 1, अशोक नगर 1, गजानन नगर 4,  रामदेव बाबा नगर 1, यशवंत नगर 1,  दे. राजा शहर : 1,  मयुरेश्वर मंदीराजवळ 1, आदर्श कॉलनी 1, दे. राजा तालुका : गारगुंडी 5,  लोणार तालुका : गायखेड 3, जांभूळ 1, लोणार शहर : 2, बुलडाणा शहर : 6,  वावरे ले  आऊट 1, वृंदावन नगर 1, गणेश नगर 1,  शिवशंकर नगर 1, रामनगर 1,  बुलडाणा तालुका : तांदुळवाडी 1, साखळी 1,  शेगांव शहर : रोकडीया नगर 1, साई नगर 1, व्यंकटेश नगर 2, सुरभी कॉलनी 4, धानुका 1, जगदंबा नगर 1,  लखपती गल्ली 4,  शेगांव तालुका : मुंडगांव 1, जानोरी 1, जवळा बु 2, माटरगांव 2,  मोताळा तालुका : धा. बढे 1, माळेगांव 1,  मेहकर तालुका : दे. माळी 2, कल्याणा 1, सावत्रा 1,  चिखली तालुका : दुधलगांव 1, जळगांव जामोद तालुका : सुनगांव 3, झाडेगांव 1, जामोद 1,  जळगांव जामोद शहर : 2,    मूळ पत्ता चावडा बाजार जि. अकोला 1   संशयीत व्यक्ती पॉझीटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 85 रूग्ण आढळले आहे.

      तसेच आज 118 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे : बुलडाणा शहर : 4, सोळंके ले आऊट 1, सरस्वती नगर 1,  बुलडाणा तालुका : सावळा 1, गुम्मी 1, शेगांव शहर : 4, व्यंकटेश नगर 5, दसरा नगर 1, रोकडीया नगर 1, जिजामाता नगर 1, माळीपुरा 1,  शेगांव तालुका : जवळा बु 4, दे. राजा तालुका : दे. मही 2, गारगुंडी 1,  दे. राजा शहर :सिवील कॉलनी 1, माळीपुरा 1,   मेहकर तालुका : जानेफळ 2, कळमेश्वर 1, डोणगांव 1,  मेहकर शहर : 9, चनखोरे ले आऊट 1, जळगांव जामोद तालुका : आसलगांव 1, खेर्डा 1, मडाखेड 1, मलकापूर शहर : देशमुख नगर 1, लखनी चौक 1,  लोणार शहर : 2, लोणार तालुका : सुलतानपूर 4, धानोरा 1,  मोताळा शहर : 8, खामगांव शहर : 3, बालाजी प्लॉट 2,  बाळापूर फैल 2, अमृत नगर 1, तलाव रोड 1, टावर ले आऊट 1, सुटाळपूरा 6, फरशी 1, केला नगर 1, डी. पी रोड 1, रायगड कॉलनी 1, नंदविहार कॉलनी 1,   खामगांव तालुका : घाटपुरी 1, लांजुड 1, टेंभुर्णा 1,चितोडा 3,  कदमापूर 1, लाखनवाडा 1, संग्रामपूर शहर : 7, नांदुरा तालुका : जिगांव 7, नांदुरा शहर : 3,  सिं. राजा तालुका : मातला 1, साखरखेर्डा 1, चिखली तालुका : भरोसा 1,   मूळ पत्ता जठारपेठ अकोला 3, पारध ता. भोकरदन जि जालना 1, धावडा जि. जालना 1,   

   तसेच आजपर्यंत 23696  रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 3760 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 3760 आहे. 

  आज रोजी 1618 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 23696 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5036 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 3760 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1212 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 64 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

******   

No comments:

Post a Comment