Monday 21 September 2020

DIO BULDANA NEWS 21.9.2020

जिल्ह्यात मुसळधार…!

  • सरासरी 29.1 मि.मी पावसाची नोंद
  • सिंदखेड राजा तालुक्यात अतिवृष्टी, 69.6 मि.मी पाऊस
  • दोन तालुक्यांनी पर्जन्यमानाची गाठली शंभरी

बुलडाणा, (जिमाका) दि.21 :  गत दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात काही भागात दमदार, तर कुठे मध्यम, कुठे तुरळक अशा स्वरूपात वरूण राजा हजेरी लावत आहे. मात्र काल सर्वत्र मुसळधार पावसाचे धुमशान जिल्ह्यात दिसून आले आहे. यामुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीन, ज्वारी, मका, तीळ या पीकांचे नुकसान झाले आहे. तर सततच्या पावसाने शेतात पाणी थांबल्यामुळे कापूस पीकावरही विपरीत परीणाम होत आहे. जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्यात सर्वात जास्त 69.6 मि.मी पावसाची नोंद करण्यात आली असून ही अतिवृष्टी आहे. आज सकाळी 8 वाजेपर्यंत महसूल विभागाकडील नोंदीनुसार सरासरी 29.1 मि.मी पाऊस जिल्ह्यात झाला आहे. तसेच आतापर्यत सर्वसाधारण पर्जन्यमानाशी तुलना केली असता मलकापूर तालुक्यात 103.58 टक्के व सिंदखेड राजा तालुक्यात 102 टक्के पाऊस झाला आहे. या तालुक्यांनी पावसाची शंभरी गाठली पाच तालुके नव्वदीच्या पार आहे.

  जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत नोंदविलेला पाऊस पुढीलप्रमाणे : कंसातील आकडेवारी आजपर्यंत झालेल्या पावसाची

बुलडाणा : 27.6 मि.मी (805.6), चिखली : 20.1 (772), दे.राजा : 20.2 (658.6), सिं. राजा : 69.6 (817.9), लोणार : 33.2 (598.2), मेहकर : 42.2 (713.8), खामगांव :28.5 (553.9), शेगांव : 18.1 (550.8), मलकापूर : 20.5 (731), नांदुरा : 27.1  (710), मोताळा : 11.7 (447.4), संग्रामपूर : 55.3 (758.3), जळगांव जामोद : 4.8 (612)

 जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 8729.5 मि.मी पावसाची नोंद झाली असून त्याची सरासरी 671.5 मि.मी आहे. आतापर्यंत सर्वात कमी 447.4 मि.मी पावसाची नोंद मोताळा तालुक्यात झाली आहे. त्याची टक्केवारी 62.80 आहे.

                                                                                जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ

    जिल्ह्यातील तीन मोठ्या व 7 मध्यम प्रकल्पांत जलसाठा पुढीलप्रमाणे : आजचा पाणीसाठा व कंसात टक्केवारी – नळगंगा : 56.44 दलघमी (81.42), पेनटाकळी :58.92 दलघमी (98.25), खडकपूर्णा :86.43 दलघमी (92.54), पलढग : 7.51 दलघमी (100), ज्ञानगंगा : 33.93 दलघमी (100), मन : 36.37 दलघमी (98.75), कोराडी : 15.12 दलघमी (100), मस : 15.04 दलघमी (100), तोरणा : 7.89 दलघमी (100) व उतावळी : 19.79 दलघमी (100). 

*****

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावे

- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांचे निर्देश

बुलडाणा, (जिमाका)  दि. 21: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. तरी जिल्ह्यातील महसूल, कृषी विभागाने तातडीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी  दिले आहे.

  नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे म्हणाले, कृषी व महसूल यंत्रणेने गाव पातळीवरील आपली यंत्रणा सजग करावी.  प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये. त्याचप्रमाणे शेड नेट नुकसान, विहीर खचने, शेत खरडून जाणे, नाल्याचे पाणी शेतात घुसने आदी नुकसानीचा सुद्धा पंचनामा करावा. पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची कार्यवाही करावी. पिक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयात, कृषी सहायक यांना नुकसानीची माहिती द्यावी. पिक विमा कंपनीने नुकसान भरपाई पात्र शेतकऱ्यांना देण्याची कार्यवाही करावी, असे निर्देशही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी दिले आहे.

 विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ नुकसानीची माहिती संबधित कृषी विभाग व विमा कंपनीच्या प्रतिनिधींना द्यावी, असे आवाहनही पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 378.9 मी.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाची सरासरी 29.1 मिमी. आहे. सर्वात जास्त सिंदखेड राजा तालुक्यात 69.6 मिमी पावसाची नोंद झाली असून ही अतिवृष्टी आहे.

****

तीन लघु पाटबंधारे प्रकल्प ओव्हर फ्लो !

  • नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
  • खडकपूर्णा, पेनटाकळी प्रकल्पांतून विसर्ग सुरू

बुलडाणा,(जिमाका) दि.21 : जिल्ह्यात मागील तीन ते चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. कुठे तुरळक, तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये जलसाठा वाढला आहे.  आज 21 सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील दोन लघु पाटबंधारे प्रकल्प 100 टक्के भरले आहे. त्यामध्ये सिं. राजा तालुक्यातील तांदुळवाडी व खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी, जनुना या प्रकल्पांचा समावेश आहे.

  खडकपूर्णा प्रकल्पाचे 19 वक्रद्वारे 30 से.मी ने उघडण्यात आली असून खडकपूर्णा नदीपात्रात 22 हजार 550 क्युसेक (638 क्युमेक्स) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. पेनटाकळी प्रकल्पाची 9 वक्रद्वारे 30 से. मी उघडून नदीपात्रात 10016 क्युसेक (283.65 क्युमेक) इतका विसर्ग सोडण्यात येत आहे. मस या मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यावरून 60 से.मी उंचीवरून 84.22 क्युमेक प्रति सेकंद विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे/कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. तरी नदी पात्राशेजारील गावातील नागरीकांनी खबरदारी घ्यावी. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी  सावध राहावे, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

   तांदूळवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प पाण्याने 100 टक्के भरल्यामुळे तांदुळवाडी – महारखेड, हनवतखेड, सावखेड तेजन ता. सिं. राजा या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे खामगांव तालुक्यातील पिंप्री गवळी लघु पाटबंधारे प्रकल्प तुडूंब भरला आहे. त्यामुळे पिंप्री गवळी, कोलोरी ता. खामगांव व शेगांव तालुक्यातील जवळा बु, वरूड, गव्हाण या गावांना सतर्कतेचा इशारा उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी दिला आहे.

                                                आतापर्यंत 100 टक्के भरलेले लघुपाटबंधारे प्रकल्प

जिल्ह्यात एकूण 81 लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. यावर्षी असलेल्या संततधार पावसामुळे आतापर्यंत 64 प्रकल्प 100 टक्के पाण्याने भरले आहे. 100 टक्के भरलेले प्रकल्प पुढीलप्रमाणे : शेकापूर, पांग्री केसापूर, झरी, दहीद, मातला, पळसखेड भट, बोधेगांव, करडी, मासरूळ ता. बुलडाणा, अंचरवाडी 2, पिंपळगांव चिलम, अंचरवाडी 1, मेंढगांव,  सावखेड भोई, शिवणी आरमाळ, अंढेरा  ता. दे. राजा, मांडवा, तांदुळवाडी, केशव शिवणी, जागदरी, पिंपरखेड, विद्रुपा, गारखेड  ता. सिं. राजा,  ढोरपगांव, हिवरखेड 1, हिवरखेड 3, टाकळी, पिंप्री गवळी, निमखेड, गणेशपूर, रायधर, जनुना ता. खामगांव, चोरपांग्रा, पिंपळनेर, खंडाळा, तांबोळा, दे. कुंडपाळ, गुंधा, गांधारी, शिवणी जाट, टिटवी, हिरडव  ता. लोणार, चिखली, फत्तेपूर, पाटोदा, कटवडा, कव्हळा, तेल्हारा, ब्राह्मणवाडा, मिसाळवाडी, हराळखेड ता. चिखली, पिं. नाथ ता. मोताळा, कंडारी ता. नांदुरा, घनवटपूर, सावंगी माळी 1, पळशी, कळपविहीर, पांगरखेड, कळमेश्वर  ता. मेहकर, गोराडा, राजुरा ता. जळगांव जामोद, धा. बढे ता. मोताळा,    

********

                                     कोरोना अलर्ट : प्राप्त 434 कोरोना अहवाल 'निगेटिव्ह'; तर 103 पॉझिटिव्ह

• 81 रूग्णांना मिळाली सुट्टी

बुलडाणा,(जिमाका)दि.21 : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालां पैकी एकूण 537 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 434 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 103 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 86 व रॅपिड टेस्टमधील 17 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 297 तर रॅपिड टेस्टमधील 137 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 434 अहवाल निगेटीव्ह आहेत. 

     पॉझिटीव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे :  खामगांव शहर : 30, खामगांव तालुका : अटाळी 3, शिर्ला नेमाने 1,  नांदुरा तालुका : निमगांव 1, जळगांव जामोद शहर : 11, मोताळा शहर : 1,  मोताळा तालुका : खेडी 4, लोणार तालुका : सावरगांव मुंढे 1, मांडवा 2, किन्ही 2, चिखली शहर: 5, चिखली तालुका : मेरा खु 2, रायपूर 1, अमोना 1,   बुलडाणा शहर : 14,  मलकापूर तालुका : वाघोळा 2, झोडगा 1, वडजी 1,  मलकापूर शहर : 3, संग्रामपूर शहर : 1, शेगांव तालुका : झाडेगांव 1, कन्हारखेड 1, आडसूळ 3,   शेगांव शहर : 8, सिं. राजा तालुका : साखरखेर्डा 1, मोहाडी 1 संशयीत व्यक्ती पॉझिटीव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 103 रूग्ण आढळले आहे.  त्याचप्रमाणे उपचारादरम्यान जुना जालना रोड, दे. राजा येथील 76 वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  

      तसेच आज 81 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. 

सुट्टी देण्यात आलेले रूग्ण पुढीलप्रमाणे :  बुलडाणा शहर : 18, बुलडाणा तालुका : सागवण 1, खुपगांव 1, मेाहखेड 1, मासरूळ 1,दुधा 1,  चांडोळ 1, डोमरूळ 1,   मोताळा तालुका : आव्हा 1, टाकळी 1, टाकरखेड 1, माकोडी 1,  नांदुरा तालुका : निमगांव 1, वडनेर 1,  नांदुरा शहर : 10, दे. राजा शहर : 2, दे. राजा तालुका : गारगुंडी 4, दे. मही 1,  सावरगांव जहागीर 1, लोणार तालुका : जांभूळ 1, लोणार शहर : 1, मलकापूर शहर : 2, मलकापूर तालुका : कुंड 1,  खामगांव शहर : 2, चिखली तालुका : खंडाळा 1, शिरपूर 1, दुधलगांव 2,  चिखली शहर : 3, मेहकर तालुका : सावत्रा 2, हिवरा गार्डी 4, जळगांव जामोद तालुका : वडशिंगी 7, पळशी घाट 1, मडाखेड 1,  जळगांव जामोद शहर : 3.    

   तसेच आजपर्यंत 26419 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 4726 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 4726 आहे.  

  आज रोजी 1579 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 26419 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 5951 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 4726 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 1150 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 75 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

****** 

No comments:

Post a Comment