Posts

Showing posts from January, 2020

DIO BULDANA NEWS 31.1.2020

जागतिक सुर्यनमस्कार दिवसाचे आज आयोजन जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदानावर होणार कार्यक्रम     बुलडाणा, दि. 31 :     क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशान्वये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा व क्रीडा भारती यांचे संयुक्त विद्यमाने, सामुहिक सुर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन दि.1 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 7.45 ते 8.30 वाजता जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल मैदान येथे करण्यात येणार आहे.         जागतीक सुर्यनमस्कार दिनाचे आयोजनासंदर्भात दि.30 जानेवारी 2020 रोजी  जिजामाता प्रेक्षागार मैदानवरील कक्षात सभा पार पडली. यावेळी  जिल्हा क्रीडा अधिकारी   शेखर पाटील,  शिक्षणाधिकारी (माध्यमिक)  डॉ.श्रीराम पानझाडे ,क्रीडा  भारतीचे श्रीकृष्ण शेटे, सदानंद काणे, बाळ आयचीत, आरोग्य भारतीचे डॉ. राजेश्वर उबरहंडे, आर्ट ऑफ लिव्हींगचे  प्रशांत लहासे, बी.डी.सावळे, सौ.अंजली परांजपे, राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे, पी.आर.वानखडे तसेच योग संदर्भात काम करणाऱ्या संस्थांचे प्...

DIO BULDANA NEWS 29.1.2020

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज सादर करावे 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत मुदत   बुलडाणा, दि. 29 : क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्याची योजना कार्यान्वित आहे.   यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अंतर्गत उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक), राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, शिवछत्रपी राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.   सन 2018-19 या वर्षासाठीच्या पुरस्कारासाठी 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावे.             या पुरस्कारासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्यात येतील.   संबंधितांनी ऑनलाईन अर्जामध्ये आपल्या कामगिरीच्या तपशिलासह   www.mumbaidivsports.com   या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या link वर अर्ज व संबंधित माहिती सादर करावी.   ऑनलाई...

सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध - पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे

Image
पोलीस कवायत मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा थाटात कर्जमुक्ती योजनेतून 2 लक्ष 940 पात्र शेतकऱ्यांना 140.74 कोटीचा लाभ जिल्हा मुख्यालयी तीन ठिकाणी शिव भोजन थाळी सुरू अवैध गुटखा विक्रीतून जिल्ह्याला मुक्त करण्याचा निर्धार शिष्यवृत्ती योजनांमधून 9 कोटी 40 लक्ष रूपये शिष्यवृत्तीचे वाटप बुलडाणा, दि. 26 -   जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रात अग्रेसर रहावा, यासाठी प्रयत्न केल्या जाणार आहे. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे प्रतीपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज केले.     भारतीय प्रजासत्ताकाचा 70 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधीत करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार संजय गायकवाड,  जि.प अध्यक्षा मनिषा पवार, उपाध्यक्ष कमलताई बुधवत,  माजी आमदार विजयराज शिंदे,  नगराध्यक्षा श्रीमती नजमुन...

DIO BULDANA NEWS 24.1.2020

आयकरास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत ·          5 फेब्रुवारी 2020 अंतिम मुदत ·          जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन    बुलडाणा, दि. 24 :    राज्य शासनाकडून जिल्ह्यातील निवृत्तीवेतन धारक किंवा कुटूंब निवृत्ती वेतनधारक यांना वित्तीय वर्ष 2019-20 मध्ये आयकर भरण्यास पात्र असल्यास त्यांनी संबंधित कागदपत्रे सादर करावीत.  त्यामध्ये बचतीचा तपशील, अपंग प्रमाणपत्र, पॅन कार्ड याव्यतिरिक्त आयकराचा भरणा केला असल्यास गणनापत्रक, चलान आदी संपूर्ण तपशील 5 फेब्रुवारी 2020 पर्यंत जिल्हा कोषागार कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावा. जेणेकरून आयकर भरण्यास पात्र असलेले निवृत्ती वेतन धारक अथवा कुटूंब निवृत्ती वेतन धारक यांचे निवृत्ती वेतन आहरीत करून अदा करणे सोयीचे होईल. तसेच निवृत्ती वेतन अदा करण्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची नोंद घ्यावी. तरी आयकर भरणा करण्यास पात्र असलेल्या निवृत्तीवेतन धारकांनी कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा कोष...

DIO BULDANA NEWS 23.1.2020

अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावे ·          न्युक्लीयस बजेट योजनेतंर्गत मिळणार लाभ ·          7 फेब्रुवारी 2020 अंतिम मुदत    बुलडाणा, दि. 23 :    प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील बुलडाणा जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांकडून न्युक्लिअस बजेट योजना सन 2019-20 अंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने गट अ- उत्पन्न वाढीच्या योजनांसाठीचे अर्ज समाविष्अ आहे. सदर अर्ज 7 फेब्रुवारी 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत  प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला  या कार्यालयाकडे सादर करावे.  योजनेतंर्गत अनुसूचित जमाती प्रवर्गातील युवतींना पिठगिरणी मशीन 85 टक्के अनुदान 38 लाभार्थ्यींना पुरविण्यात येणार आहे. तसेच 16 आदिवासी लाभार्थी बांधवांना 85 टक्के अनुदानावर कोंबडी शेड पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी लक्षांकानुसार पात्र लाभार्थ्...

DIO BULDANA NEWS 18.1.2020

Image
शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी                                                                                  - जिल्हाधिकारी ·          फिट इंडिया मोहिमेतंर्गत सायकल रॅली     बुलडाणा, दि. 18  :  शरीराच्या तंदुरूस्तीकरीता नियमित्‍ व्यायाम करणे गरजेचे आहे. सायकल चालविणे हा सुद्धा व्यायामच आहे. सायकल केवळ शरीराच्या तंदुरूस्तीकरीताच नाही, तर पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी उपयोगी आहे. त्यामुळे शरीराच्या तंदुरूस्तीसह पर्यावरण रक्षणासाठी नियमित सायकल चालवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी आज केले.    भारत सरकारच्या युवा ...