Friday 7 July 2017

news 7.7.2017 DIO BULDANA

नागपूरच्या मत्स्यविज्ञान महाविद्यालयाची चमू करणार मत्स्यबीज केंद्राची पाहणी
  • 13 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वाजता कार्यक्रम
  • मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे
बुलडाणा, दि. 7 -  विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय विकास कृती आराखड्या संबंधीत माहिती, संकलन करण्याकरीता मत्स्यविज्ञान महाविद्यालय, नागपूर येथील चमू शासकीय मत्स्यबीज केंद्र, कोराडी ता. मेहकर येथे पाहणी करणार आहे. त्याअनुषंगाने 13 जुलै 2017 रोजी सकाळी 10 वाजता सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या पदाधिकारी यांनी कोराडी, ता. मेहकर येथे उपस्थित रहावे.
    सोबत येताना पदाधिकारी यांनी सन 2015-16 व 2016-17 वर्षाचे आपले मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थेची लेखा परीक्षण अहवाल, मच्छिमार सहकारी संस्थेचे मत्स्यबीज संचयन/मत्स्योत्पादन/सभासदांची यादी/संस्थेने सभासदांसाठी राबविलेल्या विविध योजना संबंधीची माहिती आणावी. या चमूमध्ये सहयोगी प्राध्यापक येणार आहे. ते प्रत्यक्ष चर्चा करून प्रश्नावली स्वरूपात माहिती उपलब्ध करून घेणार आहेत. तरी या कार्यक्रमाला सर्व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी उपरोक्त ठिकाणी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त स.ई नायकवडी यांनी केले आहे.
****

पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालयात मतदार जनजागृती कार्यशाळा
बुलडाणा, दि. 7 -  पंकज लद्धड अभियांत्रिकी महाविद्यालयात तरूण मतदार जनजागृती अभियानातंर्गत मतदार जनजागृती कार्यशाळेचे आयोजन 6 जुलै 2017 रोजी करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र देशमुख, तहसीलदार सुरेश बगळे, दिनेश गिते, सुनील शेळके, राजेंद्र जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रदीप जावंधीया यांनी तरूण मतदारांना मार्गदर्शन केले व मतदार यादीत नाव नोंदविले नसल्यास नाव नोंदविण्याचे आवाहन केले.
  यावेळी त्यांना मतदान करण्याचे महत्वही पटवून देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिक्षक राजेंद्र जाधव यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तलाठी शिवाजी देशमुख, अव्वल कारकून प्रकाश डब्बे, कैलास राऊत, अजय राऊत यांनी प्रयत्न केले.
                                                            ****

No comments:

Post a Comment