Tuesday 18 July 2017

news 18.7.2017 dio buldana

शेतकऱ्यांनी पिक विमा योजने सहभागी व्हावे
-         जिल्हाधिकारी
  • 31 जुलै 2017 पर्यंत पिक विमा भरावा
  • आपले सरकार केंद्रचालक, बँक प्रतिनिधी व कृषि विभाग यांचे संयुक्त प्रशिक्षण
  • आपले सरकार केंद्रामार्फत पिक विमा भरण्याची सुविधा
  • पिक विमा अर्ज भरताना आधार कार्ड आवश्यक
  • शेतकऱ्यांनी आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करावा
बुलडाणा, दि. 18 -  अनिश्चित हवामान बदलामुळे शेती व्यवसाय संक्रमण अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची हमी देणे आवश्यक आहे. शेतीच्या नुकसानीची भरपाई देणारी प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजना  खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यातील 9 पिकांकरिता लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 असून शेतकऱ्यांनी अंतिम तारिखची प्रतिक्षा न करता जास्तीत जास्त संख्येने पीक विमा योजनेत सहभागी व्हावे. योजनेत सहभागी होवून नुकसानीपासून निश्चित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
    प्रधानमंत्री कृषि पिक विमा योजनेविषयी आपले सरकार केंद्र चालक, बँक प्रतिनिधी व कृषि विभागाच्या सांख्यिकी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम नियोजन समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. श्रोते, नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे, भारतीय कृषि विमा कंपनीचे प्रतिनिधी अतुल झनकर, सीएससीचे जिल्हा व्यवस्थापक जयेश कोठारे, कृषि विभागाचे तांत्रिक अधिकारी अमोल शिंदे आदी उपस्थित होते.
   यावर्षीपासून शासनाने बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याची सुविधा आपले सरकार केंद्रामध्ये दिलेली असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांनी जवळच्या बँक शाखेत किंवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जावून आपला पिक विमा अर्ज भरून घ्यावा. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे. आपले सरकार केंद्रचालकांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे. शेतकऱ्यांच्या गैरसमजूती करू नये, त्यांच्याशी सौजन्याने वागून पिक विमा योजनेचा अर्ज भरून द्यावा. जिल्ह्यातील कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्राबाबत शेतकऱ्यांची तक्रार आल्यास लगेच त्याच्या केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.
  ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांनी पिक विमा अर्ज भरताना आधार कार्ड सोबत आणावे. आधार क्रमांकाशिवाय अर्ज परिपूर्ण भरल्या जावू शकत नाही. त्यामुळे आधार कार्ड सोबतच आणावे. आधार कार्ड उपलब्ध नसल्यास आधारकार्ड नोंदणी पावतीसोबत मतदान ओळखपत्र, किसान क्रेडीट कार्ड, नरेगा जॉबकार्ड किंवा वाहन चालक परवाना यापैकी एक फोटो ओळखपत्र सादर करावे. यावर्षीपासून योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभाग घेण्यासाठी विमा प्रस्ताव तयार कतेवेळी आधारकार्ड व फोटो असलेल्या खातेपुस्तकाची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक केले आहे.  शेतकऱ्यांनी शेवटच्या दिवशीची गर्दी टाळण्यापेक्षा जास्तीत जास्त संख्येने त्वरित पिक विमा योजनेचे अर्ज भरून आवश्यक विमा हप्ता भरून द्यावा. त्याचप्रमाणे बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी आधार क्रमांकाशी जोडले गेलेले बँक खाते क्रमांकच अर्जावर नमुद करावा लागणार आहे. शेतकऱ्यांनी आपले आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्नीत करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.
     याप्रसंगी  जिल्हाधिकारी यांनी केंद्र चालक, बँक प्रतिनिधी यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. तसेच समन्वयातून आपले सरकार केंद्र चालक यांचे प्रश्न सोडविण्याच्या सूचना दिल्या. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आपले सरकार केंद्र चालक, बॅक शाखा, तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-            असा आहे विम्याचा हप्ता
  पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे
खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 24 हजार, हप्ता 480 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600  रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, भुईमुग : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 800 रूपये, तीळ : विमा संरक्षीत रक्कम 22 हजार, हप्ता 440 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 2000 रूपये राहणार आहे.
                                                                        *****
        अखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचे आयोजन
बुलडाणा,18 -  खामगांव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा सेमिस्टर एक ते पाच चे आयोजन करण्यात आल आहे. ही परीक्षा 10 ऑगस्ट 2017 पर्यंत होणार आहे. त्यानुसार नियमित व माजी प्रशिक्षणार्थ्यांनी परीक्षेला औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खामगाव येथे उपस्थित रहावे.
  सदर परीक्षेचे वेळापत्रकानुसार 19 जुलै रोजी सकाळी 9.30, 2.30 या वेळेस पेपर होणार आहे. त्याचप्रमाणे 20 जुलै रोजी सकाळी 9.30 व 2.30, 21 जुलै रोजी 9.30 व 2.30, 22 जुलै रोजी 9.30 व 2.30, सोमवार 24 जुलै रोजी सकाळी 9.30 व दुपारी 2.30, 25 जुलै रोजी सकाळी 9.30 वाजता, 26 जुलै सकाळी 9.30, 27 जुलै सकाळी 9.30, 28 जुलै सकाळी 9.30 वाजता, 31 जुलै रोजी सकाळी 10.30 व 2.30 वाजता, 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 व 2.30 वाजता, 2 ऑगसट रोजी सकाळी 9.30 व 2.30, 3 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 व 2.30, 4 ऑगस्ट रोजी 10.30 व 2.30, 5 ऑगस्ट, 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट व 10 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 10.30 व दुपारी 2.30 वाजता परीक्षा घेण्यात येणार आहे.   परीक्षेचे वेळापत्रक संस्थेच्या सुचना फलकावर लावण्यात आलेले आहे,  असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी कळविले आहे.
                          *******
पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांचा दौरा
बुलडाणा दि. 18 - राज्याचे कृषि‍ व फलोत्पादन मंत्री, तथा पालकमंत्री  पांडुरंग  फुंडकर आज जिल्हा  दौऱ्यावर  येत  आहेत. त्यांचा दौरा  कार्यक्रम  पुढीलप्रमाणे :- बुधवार  19 जुलै 2017 रोजी  सकाळी  5.28 वाजता  शेगाव  येथे  आगमन  व शासकीय  मोटारीने  खामगांवकडे प्रयाण, सकाळी 6.00 वाजता  खागगांव  येथे  आगमन व राखीव, दुपारी 12 वाजता खामगांव येथून शासकीय मोटारीने अटाळी ता. खामगांवकडे प्रयाण, दुपारी 12.30 वाजता अटाळी येथे आगमन व राखीव, 1 वाजता अटाळी येथे आयोजित बैठकीस उपस्थिती, सोयीनुसार अटाळी येथुन  शासकीय  मोटारीने खामगांवकडे प्रयाण, खामगांव  येथे  आगमन, राखीव मुक्काम असेल.

                                                              ********

No comments:

Post a Comment