Thursday 6 July 2017

news 6.7.2017 dio buldana

जिल्ह्यातील नऊ पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू
  • 31 जुलै 2017 पर्यंत पिक विमा भरावा
  • कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा बंधनकारक
  • कापूस व सोयाबीन पिकाला संरक्षीत रक्कम 40 हजार रूपये
बुलडाणा, दि. 6 -  खरीप हंगाम 2017 साठी जिल्ह्यातील नऊ पिकांकरिता पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेनुसार  पिकांना मिळालेल्या विमा संरक्षणामुळे नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देता येणार आहे. तसेच पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखून कृषि क्षेत्राच्या पतपुरवठ्यात सातत्य राखता येणार आहे. जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला विमा लागू करण्यात आला आहे.
  जिल्ह्यातील कर्जदार शेतकाऱ्यांना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी पिक विमा बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडे पट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यासाठी पात्र आहेत. शेतकऱ्यांवरील विम्याच्या हप्त्याच्या भार कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के मर्यादीत ठेवण्या आला आहे. योजनेतील विमा उतरविलेल्या पिकांसाठी जोखिम स्तर 70 टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी याकरीता विमा हप्ता सीएससी मार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पिक विमा भरण्याची अंतिम तारिख 31 जुलै 2017 पर्यंत आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे यांनी केले आहे.
-         असा आहे विम्याचा हप्ता
  पिक विमा संरक्षित रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा पीक विमा हप्ता रक्कम प्रति हेक्टर खालीलप्रमाणे
खरीप ज्वारी : विमा संरक्षीत रक्कम 24 हजार, हप्ता 480 रूपये (प्रति हेक्टर), मका : विमा संरक्षीत रक्कम 25 हजार, हप्ता 500 रूपये, तुर : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600  रूपये, मुग : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, उडीद : विमा संरक्षीत रक्कम 18 हजार, हप्ता 360 रूपये, भुईमुग : विमा संरक्षीत रक्कम 30 हजार, हप्ता 600 रूपये, सोयाबीन : विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 800 रूपये, तीळ : विमा संरक्षीत रक्कम 22 हजार, हप्ता 440 रूपये आणि कापूस पिकासाठी विमा संरक्षीत रक्कम 40 हजार, हप्ता 2000 रूपये राहणार आहे.
******
 जिल्हा नियोजन समिती निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध

बुलडाणा, दि. 6 -  महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (निवडणूक) नियम 1999 चे नियम 5 नुसार जिल्ह्यात नियोजन समितीच्या निवडणूकीकरीता जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात अंतिम मतदार यादी उद्या 7 जुलै 2017 रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी मलकापूर, चिखली, बुलडाणा, संग्रामपूर, जळगांव जामोद, नांदुरा, खामगांव, सिंदखेड राजा, दे.राजा, मेहकर, मोताळा, लोणार व शेगांव यांच्या कार्यालयातही सदर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment