आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘अस्मिता लीग’ क्रीडा स्पर्धेचे आयोजन

 


बुलढाणा (जिमाका), दि. 5 : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरु युवा केंद्र(My Bharat) व जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता तालुका क्रीडा संकुल, चिखली येथे जिल्हास्तरीय अस्मिता लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा 13 वर्षाखालील, 13 ते 18 वयोगट व 18 वर्षावरील मुली व महिलांसाठी आयोजित करण्यात आली असून, 100 मीटर, 200 मीटर व 400 मीटर धावण्याच्या स्पर्धांचा समावेश आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी अस्मिता पोर्टल https://nsrs.kheloindia.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी खेलो इंडिया प्रशिक्षक अक्षय गोलांडे (मो.9975105222) तसेच जिल्हा युवा समन्वयक  आकाश साळोक (मो. 8379890101) यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुली व महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी  प्रणीत सांगवीकर व जिल्हा क्रीडा अधिकारी  बी. एस. महानकर यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या