थेट कर्ज योजना; लाभार्थ्यांची 2 एप्रिलला लॉटरी पद्धतीने निवड

 


बुलढाणा जिमाका दि.23 : साहीत्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, बुलढाणा जिल्हा कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येणार आहे. लाभार्थी निवड दि. 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलढाणा येथे चिठ्ठीद्वारे (लॉटरी पद्धतीने) केली जाणार आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लाभार्थी निवड समितीच्या बैठकीत एकूण 126 अर्ज पात्र ठरविण्यात आले आहेत. यामध्ये 86 पुरुष व 40 महिला लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी एकूण 90 लाभार्थ्यांची अंतिम निवड करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा एक लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

पात्र अर्जदारांची यादी महामंडळाच्या कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधितांनी याची नोंद घ्यावी. तसेच जिल्ह्यातील सर्व पात्र अर्जदारांनी संबंधित दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दिनेश श. पाखमोडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या