विधी सेवा महाशिबिरात एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

 


 

बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : चिखली तालुक्यातील अमडापूर येथे आयोजित विधीसेवा महाशिबिर व शासकीय योजनांच्या महामेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातील एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हा शुभारंभ उच्च न्यायालय मुंबई, खंडपीठ नागपूरचे प्रशासकीय न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या हस्ते पार पडला.

 

यावेळी उच्च न्यायालय मुंबईचे न्यायमूर्ती एम. एम. नेरलीकर, जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणाचे अध्यक्ष आर. एन. रोकडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, शीतल साखळीकर (PHN) तसेच विविध विभागांचे खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

या प्रसंगी एचपीव्ही लसीकरणाचे महत्त्व, गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून होणारे संरक्षण तसेच मुलींच्या आरोग्याच्या दृष्टीने या मोहिमेचे महत्त्व याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. महाशिबिराच्या निमित्ताने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. सिकल सेल तपासणी अंतर्गत १०० लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली, तर महिला दिनानिमित्त ३०० महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आयुष कार्यक्रमांतर्गत वनौषधीविषयीची १०० पुस्तके लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. विधीसेवा महाशिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या उपस्थितीत पार पडला.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन