पळशी झाशी तिर्थ स्थळाला दोन कोटी रुपये मंजुर; संस्थांच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार

 



 

बुलढाणा (जिमाका) दि.16: पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील  पळशी झाशी या तीर्थस्थळाला दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.  संस्थांच्या वतीने केंद्रीयमंत्री प्रतापराव  जाधव यांचा सत्कार नुकताच सत्कार करण्यात आला.

 

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातर्गत  येणारे पळशी झाशी शंकरगिरी महाराज संस्थांन हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या संस्थांला  सरकारच्यावतीने  ब दर्जा तीर्थस्थळाचा दर्जाही देण्यात आला आहे . तसेच  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत दोन  कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व या विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या वतीने या संस्थांना निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश आले असून 13 मार्च रोजी यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित झाला आहे.  त्यामुळे या तीर्थस्थळाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. या निधी अंतर्गत भव्य सभागृह प्रसादालय इतर विकसित कामे केल्या जाणार आहे.  दिलेला शब्द पाळला आणि भरीव अशी मदत पळशी झाशी संस्थांना केल्याबद्दल संस्थांचे विश्वस्त अरुण पाटील मोरोडे यांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण  राज्यमंत्री प्रतापराव जाधव  यांची भेट घेऊन सत्कार केला.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या