अमडापूर येथे 8 मार्च रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा

 


 

बुलढाणा (जिमाका), दि. 6 : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलडाणा, तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ चिखली, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा तसेच जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने चिखली तालुक्यातील जगदंबा बल्लाळ देवी संस्था, अमडापूर येथे दि. 8 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विधी सेवा महाशिबिर, शासकीय सेवा योजनांचा महामेळावा व आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

 

या महाशिबिरामध्ये सुमारे ५० शासकीय स्टॉलद्वारे नागरिकांना विविध योजनांची माहिती व लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, आयुष्यमान भारत कार्ड, जात व उत्पन्न दाखले, नवीन रेशन कार्ड तसेच इतर विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय नागरिकांना नालसाच्या विविध योजना, लोकअदालत व मध्यस्थीचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य तपासणी शिबिरात डोळ्यांची तपासणी, ओरल कॅन्सर तपासणी, दातांची तपासणी* आदी विविध आजारांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांसाठी मोफत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकरी व गरजू नागरिकांनी या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अध्यक्ष आर. एन. रोकडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या