बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘हॅपी थॉट्स’ कार्यक्रम; 288 बंद्यांचा सहभाग

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 17 : बंदीजनांच्या मानसिक सबलीकरण व सकारात्मक परिवर्तनाच्या उद्देशाने बुलढाणा जिल्हा कारागृहात तेजज्ञान फाऊंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘हॅपी थॉट्स’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बंद्यांना प्रेरणादायी पुस्तके वितरित करण्यात आली. या उपक्रमाला एकूण 288 बंद्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

हा उपक्रम कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, तसेच पूर्व विभाग नागपूरचे कारागृह उपमहानिरीक्षक वैभव आगे यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह बुलढाण्याच्या अधिक्षक मेघा शंकर बाहेकर या होत्या. यावेळी तेजज्ञान फाऊंडेशनचे शिवाजी जवरे, डॉ. अजय खर्चे, देवन भोपळे, राजेंद्र ढोंडगे, संतोष मलये, निलेश सोनोने, ज्योती सोनोने व रश्मी खर्चे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभेदार दरेसिंग चव्हाण, हवालदार संजय मदारकर, विजय गवळी, शिपाई संदीप राजपुत, सुरेश गुळवे, महिला शिपाई आश्विनी भालके तसेच कारागृहातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या