12 व 13 मार्च रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह; नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी

 


बुलढाणा (जिमाका), दि. 11 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा यांच्या वतीने जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी तसेच STEP अंतर्गत अल्पमुदतीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातून महिंद्रा अँड महिंद्रा, जबिल सर्किट आणि पिंपल ट्री यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना थेट कंपन्यांसमोर मुलाखत देण्याची संधी मिळणार आहे.

हा प्लेसमेंट ड्राईव्ह जिल्ह्यातील तीन प्रमुख केंद्रांवर आयोजित करण्यात आला आहे. त्यानुसार 12 मार्च रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चिखली येथे प्लेसमेंट ड्राईव्ह होणार आहे. तसेच 13 मार्च रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलढाणा आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोताळा येथे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग. प्र. बिटोडे यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी