राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धेचा समारोप थाटात संपन्न

 




बुलढाणा (जिमाका) दि.27: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तेंग सु-डो स्पोर्टस असोसिएशन, नांदुरा यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय तेंग सु-डो क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

दि. 24 ते 25 मार्च दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, नगर परिषद, नांदुरा येथे 14, 17 व 19 वर्षांखालील मुला-मुलींसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील विविध विभागांतून 48 मुलगे व 48 मुलींचे संघ, व्यवस्थापक, पंचाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी तेंग सु-डो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष रॉकी डिसोजा, प्रमुख अतिथी म्हणून सुभाष मोहीते, अनिल अंबुसकर, विजय अंबुसकर, पुरुषोत्तम निळे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस महानकर यांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व खेळाडू, प्रशिक्षक व पंचांचे कौतुक केले. पराभूत खेळाडूंनी सातत्याने सराव करून पुढील स्पर्धांमध्ये यश मिळवावे, असे आवाहन करत विजेत्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात रॉकी डिसोजा यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

स्पर्धेत सर्व सहभागी खेळाडूंना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले, तर प्राविण्य प्राप्त खेळाडूंना प्रमाणपत्रे व पदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ऑल ओव्हर गुणांकनात मुंबई विभाग प्रथम, अमरावती विभाग द्वितीय, पुणे विभाग तृतीय व लातूर विभाग चतुर्थ क्रमांकावर राहिले. विजेत्या संघांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल अंबुसकर यांनी तर विजय अंबुसकर यांनी आभार प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, पंच, स्वयंसेवक व तेंग सु-डो असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी