ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी आनंद दिघे कल्याणकारी मंडळाची सदस्य नोंदणी सुरू

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : संदर्भीय शासन आदेशान्वये धर्मवीर आनंद दिघेसाहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मिटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाअंतर्गत राज्यातील ऑटो रिक्षा व मिटर टॅक्सी चालकांसाठी सदस्य नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक चालकांनी मंडळाच्या संकेतस्थळावर https://ananddighekalyankarmandal.org/home/resgister या लिंकवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

या मंडळामार्फत ऑटो रिक्षा व टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये जीवन विमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्य विषयक लाभ, कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजना, चालकांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, ६५ वर्षांवरील चालकांसाठी सन्मान निधी योजना तसेच कामगार कौशल्य विकास योजना आदींचा समावेश आहे.

सदस्यत्वासाठी अर्जदाराकडे ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी बॅज, वैध वाहन परवाना (लायसन्स) आणि परवाना (परमिट) असणे आवश्यक आहे. तसेच अर्ज करताना नोंदणी शुल्क व ओळखपत्र शुल्क मिळून ५०० रुपये आणि वार्षिक सभासद शुल्क ३०० रुपये ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे.

राज्यातील पात्र ऑटो रिक्षा व मिटर टॅक्सी चालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी