शेगांव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

 


बुलढाणा, दि. २ (जिमाका): माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या शेगांव तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ग्रामविकास विभागाच्या आदेश दि. १७ फेब्रुवारी २०२६ नुसार प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

प्रभाग रचनामध्ये भास्तन, मच्छिद्रखेड, डोलारखेड, भोनगांव, पहूरपुर्णा, मनमगांव, गोळेगांव बु., पाडसुळ, आडसुळ, झाडेगांव, श्री क्षेत्र नागझरी, हिंगणा वेज, वरखेड बु., जवळा बु., जवळा पळ., गव्हाण, तित्रव, वरुड, तरोडा कसवा, शिरसगांव निळे, गायगांव बु., टाकळी विरो, चिंचोली का., अळसणा, सांगवा, जानोरी, तरोडा तरोडी, खेड, गोलखेड, पहूरजिरा, जलंब, मोरगांव दि., बेलूरा व माटरगांव बु. या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

प्रभाग रचना कार्यक्रमानुसार तहसिलदार यांनी गुगल अर्थ नकाशे सुपर इम्पोज करून प्रत्येक गावाचे नकाशे अंतिम करणे, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्थळ पाहणीतून प्रभाग सीमा निश्चित करणे, तसेच तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी करणे आदी टप्प्यांची कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे.

प्रारूप प्रभाग रचना प्रस्ताव २३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार असून, ३० मार्च २०२६ पर्यंत समितीमार्फत त्यास अंतिम मान्यता देण्यात येईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ रोजी हरकती व सूचना मागविण्याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. हरकती सादर करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल २०२६ असून, प्राप्त हरकतींवर सुनावणी घेऊन २८ एप्रिल २०२६ पर्यंत प्रभाग रचना अंतिम करून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येणार आहे. आयोगाच्या मान्यतेनंतर ४ मे २०२६ रोजी अंतिम प्रभाग रचनेला व्यापक प्रसिद्धी देण्यात येईल.

तरी शेगांव तालुक्यातील सर्व नागरिकांनी सदर प्रभाग रचना कार्यक्रमाची नोंद घ्यावी व आवश्यकतेनुसार हरकती व सूचना निर्धारित मुदतीत सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या