नटराज, विश्वकर्मा व क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारांसाठी 10 एप्रिलपर्यंत अर्ज आमंत्रित
बुलढाणा
(जिमाका) दि. 30: इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत सन २०२५–२६ या वर्षासाठी
नटराज पुरस्कार, विश्वकर्मा पुरस्कार तसेच क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार देण्यात
येणार असून, यासाठी इच्छुकांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत.
सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी
कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाजप्रबोधनकार, समाजसेवक तसेच संबंधित क्षेत्रात
कार्यरत संस्था यांना या पुरस्कारांद्वारे सन्मानित करण्यात येणार आहे. समाजप्रबोधन,
सांस्कृतिक जतन, सामाजिक संघटन, अध्यात्मिक मार्गदर्शन व आर्थिक उन्नतीसाठी उल्लेखनीय
कार्य करणाऱ्यांना या पुरस्कारासाठी पात्रता राहणार आहे.
या पुरस्कारांसाठी अर्ज करणाऱ्या पुरुष
उमेदवारांचे किमान वय ५० वर्षे, तर महिला उमेदवारांचे किमान वय ४० वर्षे असणे आवश्यक
आहे. तसेच संस्थांनी संबंधित क्षेत्रात किमान १० वर्षे कार्य केलेले असणे बंधनकारक
आहे.
इच्छुक व्यक्ती व संस्थांनी दि. १०
एप्रिल २०२६ पर्यंत आपले प्रस्ताव सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,
बुलढाणा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड,
बुलढाणा येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक मनोज मेरत यांनी केले आहे.
0000
Comments
Post a Comment