सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागविले
बुलढाणा, दि. 2 (जिमाका) : समाज
कल्याण क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच स्वयंसेवी
संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत विविध राज्यस्तरीय पुरस्कार
प्रदान करण्यात येतात.
यामध्ये
डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री
कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहू, फुले, आंबेडकर पारितोषिक,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार तसेच लोककवी वामनदादा कर्डक
पुरस्कार यांचा समावेश आहे.
सन
2024-25 व 2025-26 या वर्षांसाठी संबंधित पुरस्कारांकरिता शासनामार्फत दि. 26 फेब्रुवारी
2026 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पात्र व्यक्ती व संस्थांनी
संबंधित पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत. अर्ज संबंधित कार्यालयाकडून प्राप्त चेकलिस्टनुसार
प्रस्ताव तयार करून चार प्रतींमध्ये सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा यांच्या
कार्यालयात दि. 15 मार्च 2026 पर्यंत सादर करावेत.
सदर
अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बुलढाणा कार्यालयात उपलब्ध असून महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://sjsa.maharashtra.gov.in येथे
देखील उपलब्ध आहेत.
अधिक
माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,
बुलढाणा यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment