शेगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी पोटनिवडणूक जाहीर

 


 

बुलढाणा (जिमाका), दि. 24: राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार शेगाव तालुक्यांतील पाच ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये येऊलखेड, चिंचखेड, सगोडा, टाकळी व धारवला मुरा असे पाच  रिक्त ग्रामपंचायत सदस्य पदाच्या जागासाठी निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू असून निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शेगाव तहसिलदार तथा ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

 

 निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे, असे प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या