दिव्यांग लाभार्थ्यांनी 15 मार्चपर्यंत यूडीआयडी कार्ड सादर करा

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 13 :तहसील कार्यालय बुलढाणा अंतर्गत विविध योजनांचा लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले यू.डी.आय.डी. (UDID) कार्ड संजय गांधी विभागात सादर करणे तसेच ते DBT पोर्टलशी संलग्न करणे अनिवार्य असल्याची माहिती तहसीलदार बुलढाणा यांनी दिली आहे.

त्यानुसार सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी संजय गांधी विभाग, तहसील कार्यालय बुलढाणा येथे 15 मार्चपर्यंत खालील कागदपत्रांच्या छायांकित प्रती जमा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे :

·         दिव्यांग प्रमाणपत्राची छायांकित प्रत

·         यू.डी.आय.डी. (UDID) कार्डची छायांकित प्रत

·         आधार कार्डची छायांकित प्रत

निर्धारित मुदतीपर्यंत कागदपत्रे जमा न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे योजना लाभ वितरण खंडित होऊ शकते, याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थ्यांची राहील, असेही तहसीलदार बुलढाणा यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिलेल्या मुदतीत आवश्यक कागदपत्रे जमा करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या