ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास स्थगिती; इरादापत्र देणे थांबविले

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : राज्यातील विविध संघटनांकडून ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत शासनाकडे विनंत्या प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दि. 9 मार्च 2026 रोजी परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुले धोरणास तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयानुसार ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांसाठी इरादापत्र (Letter of Intent) देण्याची प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बुलढाणा यांनी दिली आहे.

दरम्यान, शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांसंदर्भातील खुले धोरण राबविण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील पुढील सूचना मिळाल्यानंतरच पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या