मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत खेळाडू निवड चाचणी 5 एप्रिलला
बुलढाणा
(जिमाका), दि. 18: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे
यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मिशन लक्ष्यवेध योजना अंतर्गत जिल्हास्तर क्रीडा
निपुणता केंद्रासाठी खेळाडू निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. ही चाचणी दि. 5 एप्रिल
2026 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून रोड, बुलढाणा येथे होणार आहे.
या योजनेअंतर्गत बुलढाणा येथे वेटलिफ्टिंग व मैदानी (अॅथलेटिक्स)
या क्रीडा प्रकारांसाठी निवासी स्वरूपाचे क्रीडा निपुणता केंद्र स्थापन करण्यात येणार
आहे. निवड झालेल्या खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, अल्पोहार तसेच क्रीडा
विज्ञान विषयक सहाय्य शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे. जिल्ह्यातील पात्र
व गुणवंत खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही निवड प्रक्रिया राबविण्यात
येत आहे. इच्छुक खेळाडूंनी दि. 1 एप्रिल 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत निर्धारित नमुन्यातील
अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.
निवड निकष : खेडाळू हा 31 डिसेंबरपर्यंत 21 वर्षांखालील
मुलगे/मुली, महाराष्ट्र राज्यातील खेळाडू असणे आवश्यक, राज्यस्तरीय पदक विजेते किंवा
राष्ट्रीय स्तरावर सहभागी (SGFI, WFI, Khelo India) खेळाडू गत 2 वर्षाच्या क्रीडा कामगिरीचे
मुल्यमापन करण्यात येऊन क्रीडा कौशल्य व तंदुरुस्ती चाचण्यांमध्ये पात्र होणे आवश्यक
व शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य राहिल.
आवश्यक कागदपत्रे: जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,
अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र, 3 फोटो, बोनाफाईड प्रमाणपत्र,
पालक संमतीपत्र इत्यादी.
अर्जाचा नमुना व आवश्यक कागदपत्रांचा तपशील
https://forms.gle/LrdFvr69gSqjQQR9 या लिंक मध्ये उपलब्ध असून इच्छुक विद्यार्थ्यांनी
आवश्यक कागदपत्रासह अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, जांभरून
रोड, बुलढाणा 443001 येथे सादर करावा. तसेच अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. निवड
प्रक्रिया शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार तज्ज्ञ समितीद्वारे करण्यात येणार
आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाव्दारे जिल्हा क्रीडा अधिकारी बि.एस. महानकर यांनी
दिली.
0000
Comments
Post a Comment