सेसफंड योजनेंतर्गत लाभार्थी निवड 12 मार्च रोजी
बुलढाणा (जिमाका), दि. 11 : समाज
कल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या वतीने 20 टक्के सेसफंड योजनेअंतर्गत सन
2025-26 या आर्थिक वर्षासाठी मागासवर्गीय शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर 5 एच.पी.
विद्युत मोटार पंप तसेच मागासवर्गीय महिलांसाठी शिलाई मशीन देण्याची योजना राबविण्यात
येत आहे.
या
योजनांसाठी जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्जांची छाननी करून
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेल्या परिपूर्ण अर्जांमधून लाभार्थींची निवड ईश्वर
चिठ्ठी पद्धतीने करण्यात येणार आहे. ही निवड प्रक्रिया दि. 12 मार्च 2026 रोजी सकाळी
11 वाजता शिवाजी सभागृह, जिल्हा परिषद, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.
या
योजनांसाठी अर्ज सादर केलेल्या सर्व लाभार्थींनी व अर्जदारांनी निवड प्रक्रियेच्या
वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक गुलाब खरात,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, व जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद
यंडोले यांनी केले आहे.
०००
Comments
Post a Comment