शेगाव येथे 28 ते 30 मार्च दरम्यान सामाजिक न्याय योजनांचे मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनी नागरिकांनी लाभ घ्यावा; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

 


बुलढाणा (जिमाका), दि. 23: जिल्हा माहिती कार्यालय व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. 28 ते 30 मार्च 2026 या कालावधीत सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जातींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेगाव येथील शेगाव नगर परिषदचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी नगर भवनात मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते दि. 28 मार्च रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी, सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तीन दिवसीय या मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती छायाचित्रे, माहिती फलक व दृकश्राव्य माध्यमांच्या साहाय्याने सादर करण्यात येणार आहे. अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांसाठी शिक्षण, स्वयंरोजगार, निवास व आर्थिक सहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागरिक, अधिकारी व कर्मचारी, शालेय विद्यार्थ्यांनी या मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यासेरोद्दीन काझी यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन