अण्णासाहेब पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 



बुलढाणा जिमाका दि.23 : कष्टकरी समाजाचे कैवारी व मराठा क्रांतीसूर्य स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 44 व्या पुण्यतिथीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बुलढाणा येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सामाजिक कार्याचा व कष्टकरी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा यावेळी गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला. यावेळी जिल्हा कौशल्य विकास मार्गदर्शन केंद्र, बुलढाणा येथील सहायक आयुक्त गणेश बिटोडे, जिल्हा समन्वयक पुरुषोत्तम अंभोरे, वैभव मुंढे, सुरज जगताप, कर्मचारी वर्ग व महामंडळाचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी