आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय “अस्मिता लीग” क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

 







 

बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, यांच्या मार्गदर्शनाखाली मेरा युवा भारत (MY Bharat) व जिल्हा क्रीडा कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ वाजता तालुका क्रीडा संकुल, चिखली (ता. चिखली, जि. बुलढाणा) येथे जिल्हास्तरीय अस्मिता लीग क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

 

या स्पर्धेत १३ ते १८ वर्षांवरील मुली तसेच महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये १०० मीटर, २०० मीटर व ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारांसह विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या.

 

            महिलांचे मनोबल वाढवण्यासाठी चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले कार्यक्रमास उपस्थित होत्या. तसेच नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख, उपनगराध्यक्षा सौ. वैशालीताई खेडेकर, सहायक क्रीडा विकास अधिकारी अनुराधाताई सोळंकी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त मान्यवर तसेच लेखाधिकारी रमेश अहिरकर, आकाश चाफेकर आदी उपस्थित होते.

 

            यावेळी खेलो इंडिया प्रशिक्षक अक्षय गोलांडे, आकाश साळोक, तसेच अनेक महिला व क्रीडाप्रेमी उपस्थित होते. जिल्ह्यातील मोठ्या संख्येने मुली व महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर व जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सहभागी सर्व महिला व मुलींचे आभार मानत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या