माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : जिल्ह्यातील माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी विविध
स्वयंरोजगार संधींबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन दि. 12 मार्च 2026 रोजी
बुलढाणा येथील सैनिक सभागृह, बस स्टँड समोर येथे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी या सुवर्णसंधीचा
जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्र तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर
आयोजित करण्यात येणार आहे. माजी सैनिकांना स्वावलंबी बनविणे व त्यांना विविध स्वयंरोजगाराच्या
संधी उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असून माजी सैनिकांना विविध स्वयंरोजगार
योजना, उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच उपलब्ध शासकीय योजनांची माहिती
देण्यात येणार आहे.
0000
Comments
Post a Comment