ईश्वर चिठ्ठीद्वारे लाभार्थी निवड 9 मार्च रोजी

 


 

बुलढाणा (जिमाका), दि. 04 : महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने देण्यात येणार आहे. या योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांमधून ईश्वर चिठ्ठीद्वारे निवड करण्यात येणार असून हा कार्यक्रम सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद बुलढाणा येथे ऑन कॅमेऱ्यासमोर पारदर्शक पद्धतीने पार पडणार आहे.

 

जिल्हा परिषद सेस २०२५-२६ ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व दिव्यांग मुलींना पिठाची चक्की पुरविण्यासाठी २७९ प्राप्त अर्ज झाले असून संभाव्य ३० लाभार्थी निवड, सन २०२४-२५ ग्रामीण भागातील विशेष घटक प्रवर्गातील शाळकरी मुलींना लेडीज सायकल पुरविण्यासाठी ३७९ प्राप्त अर्ज असून १८५ लाभार्थ्य्सांची संभाव्य निवड ईश्वर चिठ्ठीद्वारे होईल. सदर निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून संबंधित पात्र लाभार्थ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालकल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या