विनोबा ॲपमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शिक्षकांचा सन्मान

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 13 :जिल्हा परिषद बुलढाणा व ओपन लिंक फाउंडेशन यांच्यातील सामंजस्य करारांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा (बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांना दर महिन्याला प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.

डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत बुलढाणा तालुका स्तरावर ‘पोस्ट ऑफ द मंथ’ म्हणून निवड झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये श्री. परवेज शेख (जि.प. उर्दू प्राथमिक शाळा, रायपूर), सौ. माधवी देशपांडे (जि.प. हायस्कूल, देऊळघाट), सौ. अनुराधा नागरे (जि.प. प्राथमिक शाळा, सिरपूर), सौ. विद्या चवरे (जि.प. उच्च प्राथमिक शाळा, देवपूर) आणि सौ. मीनाक्षी सरदेशमुख (जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळा, पाडळी) या शिक्षकांचा समावेश आहे.

याचबरोबर जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती सराव परीक्षा व स्कॉलरशिप सराव परीक्षेत तालुक्यात उत्कृष्ट निकाल देणाऱ्या शाळांचाही गौरव करण्यात आला. यात जि.प. उच्च प्राथमिक शाळा मोंढाळा (इयत्ता पाचवी स्कॉलरशिप परीक्षा), जि.प. मराठी प्राथमिक शाळा रुईखेड मायंबा (इयत्ता आठवी स्कॉलरशिप परीक्षा) तसेच जि.प. मराठी प्राथमिक शाळा दाहिद बु. (एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षा) या शाळांचा समावेश आहे.

सदर पुरस्कार बुलढाणा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पंचायत समिती बुलढाणा येथील अधिकारी व कर्मचारी तसेच आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रमाचे वरिष्ठ जिल्हा समन्वयक शेख नजीर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सन्मानित शिक्षकांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यातून तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या