खामगाव येथे 9 मार्च रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन

 


 

बुलढाणा (जिमाका), दि. 6 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खाजगी आय.टी.आय., खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. 9  मार्च 2026 रोजी विशेष प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

 

ही प्लेसमेंट ड्राइव्ह राष्ट्रसंत तुकडोजी महाराज खाजगी आय.टी.आय., शेलोडी रोड, खामगाव येथे सकाळी 10 वाजता होणार असून या उपक्रमातून नामांकित चिरायू पॉवर लिमिटेड, खामगाव या कंपनीमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेत सोलार टेक्निशियन आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू व पात्र उमेदवारांनी या प्लेसमेंट ड्राइव्हमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा आणि आपल्या करिअरला गती द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश बिटोडे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन