मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन
बुलढाणा
जिमाका दि.23 : ममता ॲण्ड मधुसूदन अग्रवाल फाउंडेशन, मुंबई तसेच
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने
बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसाठी मोफत अस्थिरोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात
आले आहे.
हे शिबिर उद्या, दिनांक २४ मार्च २०२६ रोजी जिल्हा
स्त्री रुग्णालय, बुलढाणा येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत पार पडणार आहे. या
शिबिरामध्ये गुडघा व खुबा (हिप) संबंधित अस्थीबंधन आजारांवर मोफत निदान व उपचार सुविधा
उपलब्ध करून दिली जाणार आहे.
शिबिरासाठी मुंबई येथील Sanjeevani Mamata
Hospital and Research Center मधील नामांकित अस्थिरोग तज्ञ उपस्थित राहून अत्याधुनिक
तपासणी व उपचार सेवा नागरिकांना देणार आहेत. गुडघा व हिप संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या
रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे
करण्यात आले आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार तसेच
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गीते यांनीही नागरिकांना या शिबिरात सहभागी होण्याचे
आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामार्फत
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही नमूद करण्यात
आले आहे.
0000
Comments
Post a Comment