जिल्हाधिकारी कार्यालयात शहिदांना अभिवादन
बुलढाणा
जिमाका दि.23 : थोर क्रांतिकारक
शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात
अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी
डॉ. किरण पाटील यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी
सुरेश कव्हाळे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, उपजिल्हा
निवडणूक अधिकारी सुहाशीनी गोणेवार तसेच उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प
अर्पण करून अभिवादन केले.
00000

Comments
Post a Comment