बुलडाणा डाक विभागाची उल्लेखनीय कामगिरी; पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक खात्यांचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 17 : बुलडाणा डाक विभागाने आर्थिक वर्ष 2025-2026 मध्ये पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) खात्यांच्या निव्वळ वाढीचे निर्धारित उद्दिष्ट 100 टक्के यशस्वीरित्या पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागाला 1 लाख 40 हजार नवीन खात्यांच्या निव्वळ वाढीचे उद्दिष्ट देण्यात आले होते, ते पूर्ण करण्यात बुलडाणा विभागाने आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र व गोवा परिमंडळामध्ये अशी कामगिरी करणारा बुलडाणा विभाग प्रथम क्रमांकावर असून ही बाब विभागासाठी अभिमानास्पद मानली जात आहे.

या यशामागे विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न महत्त्वाचे ठरले. उपविभागीय अधिकारी, पोस्टमास्तर, सहाय्यक कर्मचारी, ग्रामीण डाक सेवक, पोस्टमन आदींनी नागरिकांमध्ये बचत योजनांविषयी व्यापक जनजागृती केली. आवर्ती ठेव (RD), सुकन्या समृद्धी खाते (SSA) यांसारख्या विविध योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार करण्यात आला. ग्राहकाभिमुख सेवा, विश्वासार्हता आणि सुलभता यांवर भर देत ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणावर नवीन खाती उघडण्यात आली. यामुळे नागरिकांमध्ये बचतीची सवय वाढीस लागून आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळाली आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुलडाणा डाक विभागाचे कौतुक केले आहे. अधीक्षक डाकघर बुलडाणा विभाग गणेश आंभोरे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवण्याचे आवाहन केले. तसेच, ग्राहकांना दर्जेदार व उत्कृष्ट सेवा पुरविण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या

गटई कामगारांसाठी पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना; २० फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन