विभागीय हातमाग कापड स्पर्धा २४ मार्च रोजी; नागपूर येथे २० मार्चपर्यंत नमुने सादर करण्याचे आवाहन
बुलढाणा, (जिमाका) दि.१० : सहकार, पणन व वस्त्रोद्योग
विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने हातमाग विणकरांनी विणलेल्या उत्कृष्ट हातमाग
कापड नमुन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विभागीय हातमाग कापड स्पर्धा सन २०२५–२६ चे
आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली दि.
२४ मार्च २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) कार्यालय,
नागपूर येथे होणार आहे.
अमरावती व नागपूर विभागातील
सर्व जिल्ह्यांतील हातमाग विणकरांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा,
असे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी विणकरांनी तयार केलेले हातमाग कापडाचे नमुने
दि. २० मार्च २०२६ रोजी सायं. ५ वाजेपर्यंत प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग), नवीन
प्रशासकीय इमारत क्र. २, ८ वा मजला, सिव्हिल लाईन्स, नागपूर यांच्या कार्यालयात सादर
करावेत. अधिक माहितीसाठी प्रादेशिक उपआयुक्त (वस्त्रोद्योग) कार्यालय, नागपूर येथे
०७१२-२५६७२९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
000000
Comments
Post a Comment