सैलानी येथून आणलेल्या अनोळखी वृद्धाचा मृत्यू; ओळख पटविण्याचे आवाहन
बुलढाणा, दि. 9 (जिमाका) : सैलानी
येथून एक अनोळखी इसम (वय अंदाजे ८० वर्षे) यास दि. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे
११ वाजताच्या सुमारास सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र
डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर संबंधित इसमास मृत घोषित केले.
सदर
मृत व्यक्तीची ओळख पटलेली नसून त्याचा मृतदेह सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथील शवागारात
ठेवण्यात आला आहे. मृत व्यक्तीजवळ कोणतीही ओळख पटविणारी कागदपत्रे किंवा नातेवाईक नसल्यामुळे
त्याची ओळख पटविण्यासाठी तसेच नातेवाईक, मित्रमंडळी किंवा परिचित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी
बुलढाणा पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
मृत
व्यक्तीचे वय अंदाजे ८० वर्षे, रंग सावळा, उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, अंगात पांढऱ्या
रंगाचा शर्ट व पिवळ्या रंगाची टी-शर्ट, पाढऱ्या रंगाची पॅन्ट व निकर आहे. उजव्या हातात
लाल रंगाचा धागा असून कमरेला पंचरंगी दोरा आहे.
सदर व्यक्तीची ओळख पटल्यास किंवा त्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास बुलढाणा
पोलीस ठाणे येथे किंवा मो.क्रमांक ९६२३२४३७३३ वर संपर्क साधावा, असे आवाहन पो. हे.
कॉ. नरेन्द्र रोटे (ब. नं. १२०) यांनी केले आहे.
0000

Comments
Post a Comment