महिला गटांसाठी कृषि अवजारे बँक; 5 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 


बुलढाणा, (जिमाका) दि. 12 : शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून शेतकऱ्यांना यंत्रसामग्री सुलभ दरात उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कृषि विभागामार्फत नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावर कृषि अवजारे बँक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत महिला शेतकरी गटांना कृषि यंत्रसामग्री खरेदीसाठी अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक गटांनी दि. 5 एप्रिल 2026 पर्यंत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रास्त दरात कृषि यंत्रसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी एक गाव – एक अवजारे बँक ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक तालुक्यासाठी विशिष्ट लक्षांक निश्चित करण्यात आला असून पोकरा अंतर्गत निवड झालेल्या गावांतील महिला गटांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी उमेद पुरस्कृत महिला बचत गट, माविम पुरस्कृत महिला बचत गट तसेच महिला गाव संघ हे गट पात्र आहेत. अवजारे बँकेत बीबीएफ यंत्र, बेडमेकर, बियाणे टोकण यंत्र, भात पेरणी व कापणी यंत्रे, ट्रॅक्टर व ट्रेलर, कम्बाइन हार्वेस्टर व मळणी यंत्र, ड्रोन आधारित फवारणी यंत्र, कांदा लावणी व काढणी यंत्र इत्यादी आधुनिक कृषि यंत्रसामग्रीचा समावेश राहणार आहे.

एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थी गटाची निवड ऑनलाईन संगणकीय सोडत पद्धतीने करण्यात येईल. निवड झालेल्या गटांनी ग्राम कृषि विकास समितीचे शिफारसपत्र पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

news 9.6.2017 dio buldana

ग्रामपंचायत सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर; हरकती व सूचना २५ जूनपर्यंत मागविल्या