राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी केली आरोग्य तपासणी आणि साहित्य नोंदणी; लवकरच होणार साहित्य वाटप शिबीर
बुलढाणा (जिमाका) दि. 9 : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून
संपन्न झालेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यात दिव्यांग बांधवांसाठी विशेष आरोग्य तपासणी
व नोंदणी शिबिराच आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 2 हजार 786 दिव्यांग बांधवांनी
उस्फुर्त सहभाग नोंदवत साहित्याची नोंदणी केली. या दिव्यांग बांधवांना लवकरच साहित्याचे
वाटप विशेष शिबिर घेऊन वितरित करण्यात येणार आहे.
केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री
प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून आयुष मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय आरोग्य मेळावा
संत नगरी शेगाव येथे नुकताच घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये आयुष आयुर्वेद युनानी होमिओपॅथी
उपचार पद्धतीच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्यात. या शिबिरात दिव्यांग बांधवांसाठी
27 फेब्रुवारीला आरोग्य तपासणी व साहित्य नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये जिल्ह्याभरातील 2 हजार 786 दिव्यांग
बांधवांनी सहभाग नोंदवून आपली तपासणी व साहित्याची नोंदणी केली. राष्ट्रीय वयोश्री
योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना कर्णयंत्र, चालण्याची काठी, कंबरपट्टा, पायाचा पट्टा,
व्हीलचेअर, इलेक्ट्रिक व्हीलचेअर असं जवळपास एका लाभार्थ्याला दहा हजार रुपयांचे साहित्य
वितरित करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग बांधवांना कृत्रिम अवयवांचही वितरण करण्यात
येणार आहे. या शिबिरामध्ये दिव्यांग बांधवांसाठी लागणाऱ्या साहित्याची नोंदणी केल्या
गेली त्यानुसार हे साहित्य उपलब्ध झाल्यानंतर विशेष शिबिर घेऊन हे सर्व साहित्य वाटप
केल्या जाणार आहे. शिवाय खासदार निधी अंतर्गत ही काही साहित्यांचे वाटप याच दिवशी केल्या
जाणार आहे . साहित्य वाटप शिबिराची तारीख जाहीर करून यासंदर्भातची माहिती सर्व दिव्यांग
बांधवांना देण्यात येणार आहे. बांधवांनी नोंदविलेल्या कृत्रिम अवयव बनवण्याची प्रक्रिया
ही सुरू झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव
जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
00000

Comments
Post a Comment