बुलढाणा क्षय आरोग्यधाम येथे जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा

 



बुलढाणा (जिमाका), दि. 25: जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षय आरोग्यधाम, बुलढाणा येथील रुग्णालयात विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. १९८२ पासून दरवर्षी २४ मार्च रोजी साजरा होणाऱ्या या दिनानिमित्त यंदाची होय! आम्ही क्षयरोगाचा अंत करू शकतो : देशांच्या नेतृत्वाखाली लोकांच्या मदतीने ही संकल्पना प्रभावीपणे मांडण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशील चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व डॉ. रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एच. आर. खान यांनी क्षयरुग्णांची सद्यस्थिती, आकडेवारी तसेच शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक दत्तात्रय वाघमारे यांनी क्षयरुग्णांवरील स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. आहार तज्ञ डॉ. मयुरी देशमुख यांनी रुग्णांना प्रथिनयुक्त आहाराचे महत्त्व समजावून सांगत योग्य आहाराचे मार्गदर्शन केले. यावेळी क्षयरोगावर मात केलेल्या रुग्णाची प्रेरणादायी व्हिडिओ क्लिपही दाखविण्यात आली. याशिवाय, परिसेविका मीना जोंधळे यांच्या वतीने प्रोटीन पावडर तसेच अधिपरिचारिका सोनाली दाबेराव यांच्या वतीने एनर्जी ड्रिंकचे रुग्णांना वाटप करण्यात आले.

डॉ. सुशील चव्हाण यांनी क्षयरोगाविरुद्ध लढण्यासाठी रुग्णांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिंदा जायभाये यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामनंदन चव्हाण यांच्यासह सर्व कर्मचारीवर्गाने परिश्रम घेतले. यावेळी डॉ. आनंद कोठारी व डॉ. मोहिनी खेडेकर यांचीही उपस्थिती होती.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी