खामगाव शासकीय तंत्रनिकेतन येथील निर्लेखित साहित्यांचा लिलाव; 16 मार्चपर्यंत निविदा मागविल्या
बुलढाणा (जिमाका), दि. 04 : शासकीय
तंत्रनिकेतन, खामगाव येथील विविध विभागांमधील जडवस्तू संग्रहातील निरुपयोगी, कालबाह्य
व निर्लेखित झालेल्या यंत्रसामुग्री, उपकरणे तसेच इतर साहित्यांची विक्री लिलाव पद्धतीने
करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक खरेदीदार, भंगार व्यावसायिक, कंत्राटदार व ठेकेदार
यांच्याकडून सीलबंद लिफाफ्यात निविदा मागविण्यात आल्या आहेत.
लिलाव
प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच मुख्य सूचना फलकावर
प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुकांनी दि. 16 मार्च 2026 पर्यंत आपली निविदा भरून शासकीय
तंत्रनिकेतन, खामगाव कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले
आहे.
निविदा
सादर करताना आवश्यक कागदपत्रे, अटी व शर्ती यांची पूर्तता करणे बंधनकारक राहणार आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाशी दूरध्वनी क्रमांक ०७२६३-२५६६४४ (प्राचार्य) व ०७२६३-२५२२७८
(कार्यालय) यावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment