जिल्ह्यातील 59 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणूका जाहीर

 


        नामनिर्देशन पत्र 7 ते 13 एप्रिल दरम्यान दाखल करता येणार

                              28 एप्रिल रोजी मतदान

                              आदर्श आचारसंहीतेचे काटेकोर पालन करावे

बुलढाणा, (जिमाका) दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाकडून घोषीत केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच व सदस्यांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  या ग्रामपंचायतींमध्ये 17 मार्च 2026 च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

            आयोगाच्या आदर्श आचार संहीता त्या-त्या ठिकाणच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. या क्षेत्रातील मतदारांवर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आचारसंहीता कालावधीत कुठेही करता येणार नाही.

  निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे : निवडणूकीची अधिसूचना सोमवार दि. 30 मार्च 2026 रोजी संबधित तहसिल कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. या कार्यक्रमानुसार निवडणुकीकरीता नामनिर्देशनपत्र दि. 7 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 3 वाजेदरम्यान स्वीकारले जाणार आहे. नामनिर्देशन पत्र छाननी बुधवार दि. 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजूपासून छाननी संपेपर्यंत. दि. 17 एप्रिल 2026 रोजी नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. या निवडणूकीचे मतदान मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत होणार असून मतमोजणी बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी करण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाव्दारे  कळविले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी