जमीन महसूल थकबाकीसाठी मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्चला

 


बुलढाणा (जिमाका), दि. 11 : जमीन महसुलाच्या थकबाकीच्या वसुलीसाठी मौजे किनगावराजा (ता. सिंदखेडराजा) येथील गट क्रमांक 785 मधील मालमत्तेचे समपहरण करण्यात आले असून सदर मालमत्तेचा जाहीर लिलाव 17 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालय सिंदखेडराजा येथे होणार आहे.

कसूरदार सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा यांच्याकडून येणे असलेल्या जमीन महसूल थकबाकीच्या वसुलीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. मौजे किनगावराजा येथील गट क्रमांक 785, क्षेत्रफळ 0.81 हेक्टर आर., आकार रुपये 7.50/- असलेली मालमत्ता जप्त करण्यात आले आहे.

निश्चित करण्यात आलेल्या दिवसापूर्वी संबंधित देय रक्कम भरली गेली नाही तर सदर मालमत्ता तिच्यावर असलेल्या सर्व भार, अनुदाने व संविदांपासून मुक्त करून जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढण्यात येणार आहे. हा लिलाव तहसील कार्यालय सिंदखेडराजा, जि. बुलढाणा येथे दि. 17 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता किंवा त्यानंतर होणार आहे. इच्छुक नागरिकांनी नमूद दिनांक व वेळेस तहसील कार्यालयात उपस्थित राहून लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार सिंदखेडराजा यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी