पाणी टंचाई निवारणार्थ बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी टँकर मंजूर

 


 

बुलडाणा, (जिमाका) दि. 6 : पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता बुलढाणा तालुक्यातील तिन गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये पिंपरखेड, वरवंड व सैलानी या ठिकाणी ठरवून दिल्याप्रमाणे टँकरव्दारे पाणी पुरवठा केल्या जाणार आहे, अशी माहिती बुलढाणा उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी दिली.

 

            सैलानी गावाला 150 पशुधन व 1008 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 24 हजार 660 लिटर्स पाणी, पिंपरखेड गावाला 800 पशुधन व 680 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 13 हजार 600 लिटर्स पाणी व वरवंड गावाला 950 पशुधन व 3975 लोकसंख्येसाठी एक टॅंकर 40 हजार लिटर्स पाणी दररोज टँकरव्दारे पुरवठा करेल.

 

पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या पाच गावांसाठी पाणी पुरवठ्याकरिता टँकर मंजूर करण्यात आले आहे. टँकरने केलेल्या खेपांची ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी. नोंदवहीची तपासणी नियमितपणे गटविकास अधिकारी यांनी करावी. निवीदाधारकाने टँकर नादुरूस्त झाल्यास त्वरित दुसरे टँकर उपलब्ध करून द्यावे, असे उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या