क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीमुळे खेळाडूंना घरबसल्या प्रमाणपत्र; 5 टक्के आरक्षणासाठी ऑनलाईन सुविधा
‘
बुलढाणा (जिमाका), दि. 11 : महाराष्ट्र
राज्यातील गुणवंत खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमधील 5 टक्के आरक्षणाचा लाभ
अधिक सुलभ, पारदर्शक व जलद गतीने मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने
‘क्रीडा ई-प्रमाण’ ही आधुनिक प्रणाली सुरू केली आहे. ही प्रणाली ब्लॉकचेन
तंत्रज्ञानावर आधारित असून खेळाडूंना घरबसल्या प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध
झाली आहे.
या प्रणालीमुळे
खेळाडूंनी दिलेली माहिती मूळ नोंदींशी जुळल्यास 24 तासांच्या आत डिजिटल पडताळणी
अहवाल उपलब्ध होतो. तसेच प्रत्येक प्रमाणपत्रावर विशिष्ट क्यूआर कोड (QR) कोड
देण्यात येणार असून संबंधित नियुक्ती प्राधिकरण(उदा. MPSC, पोलीस भरती) हा कोड
स्कॅन करून प्रमाणपत्राची सत्यता त्वरित तपासू शकणार आहे. त्यामुळे बोगस
प्रमाणपत्रांना आळा बसण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा
आयोग तसेच इतर सर्व शासकीय भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आता ‘क्रीडा
ई-प्रमाणपत्र’ जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय खेळाडू
संवर्गातील अर्जाचा विचार केला जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी विभागीय उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्याकडून प्रमाणपत्रांची
पडताळणी करून घेतलेल्या खेळाडूंनी देखील पुढील शासकीय किंवा निमशासकीय भरतीसाठी
अर्ज करताना या ऑनलाइन प्रणालीद्वारे नवीन ई-प्रमाणपत्र तयार करून घेणे आवश्यक
आहे.
‘क्रीडा ई-प्रमाण’
पोर्टलवर संघटनांकडून प्राप्त अभिलेख अपलोड करण्यात येत असून त्याच्या आधारे
खेळाडूंना 5 टक्के क्रीडा आरक्षणासाठीचे प्रमाणपत्र ऑनलाइन मिळू शकते, अशी माहिती
क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने दिली आहे.
प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याची पद्धत: या
प्रणालीअंतर्गत 5 टक्के खेळाडू आरक्षणाचे संघटनेमार्फत प्राप्त अभिलेख 'क्रीडा
ई-प्रमाण' पोर्टलवर यशस्वीरीत्या अपलोड करण्यात येत आहेत. यासाठी ज्या खेळाडूंनी
अधिकृत स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवले आहे, अशा सर्व खेळाडूंनी क्रीडा विभागाच्या
अधिकृत संकेतस्थळाला https://sports.maharashtra.gov.in/ भेट
द्यावी. संकेतस्थळावर सर्वात खाली आमच्या सेवा (Our Services) मध्ये 5
टक्के Reservation या टॅबमध्ये जाऊन आपली एक वेळ नोंदणी पूर्ण करावी. या
नोंदणीकरिता, वैयक्तिक माहिती व 'क्रीडा ई-प्रमाण' पोर्टलवर अर्ज या सर्व
बाबींसाठी खालील माहिती खेळाडूंनी तयार ठेवावी.
नोंदणीसाठी खेळाडूंनी आपल्या आधार-संलग्न (Aadhaar-linked) मोबाईल
क्रमांकाचा आणि आयडीचा वापर करणे आवश्यक आहे, स्वतःचा योग्य व दैनंदिन वापर ई-मेल
आय.डी., आधार कार्ड पीडीएफ, क्रीडा स्पर्धेत प्राप्त प्राविण्य प्रमाणपत्र, ज्या
खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध आहे, त्यांनी तत्काळ या प्रणालीचा लाभ घेऊन आपले
डिजिटल पडताळणी प्रमाणपत्र घरबसल्या प्राप्त करून घ्यावे.
ज्या खेळाडूंची माहिती अभिलेखात किंवा प्रमाणपत्रे तांत्रिक
कारणास्तव प्रणालीवर दिसत नसतील, तर support@kridaepramaan.org या ई-मेलवर आपली तक्रार
आपल्याकडे असलेल्या क्रीडा प्रमाणपत्रासह नोंदवावी. अधिक माहितीसाठी आणि
मार्गदर्शक सूचनांसाठी खेळाडूंनी https://sports.maharashtra.gov.in/ या
संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच अन्य खेळांचे अभिलेख प्रणालीवर उपलब्ध करून
दिल्यानंतर त्याबाबतची माहिती त्वरित याद्वारे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात
येईल.
कबड्डी, फेन्सिंग, ट्रायथलॉन (२०२५ ची स्पर्धा), ज्युडो (२०२४ ची
स्पर्धा), कुराश (२०२४-२५ व २०१७-१८) ह्या स्पर्धांचे अभिलेख ऑनलाईन उपलब्ध आहेत,
त्याच खेळाडूंनी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत. इतर पात्र खेळांच्या खेळाडूंनी
नोंदणी करावी, अशी माहिती जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्याकडून प्रसिद्धी
पत्रकाव्दारे देण्यात आली आहे.
00000
Comments
Post a Comment