जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
जिल्हा कारागृहात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
बुलढाणा,दि. १ (जिमाका) : जिल्हा कारागृह बुलढाणा
व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ११ वा आंतरराष्ट्रीय
योग दिन कारागृहामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास कारागृह अधीक्षक संदीप
भुतेकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव नितीन पाटील, अॅड. विक्रांत मारोडकर, वरिष्ठ
तुरुंगाधिकारी मेघा बाहेकर, तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमात योग शिक्षिका डॉ. वैशाली
नाईक यांनी उपस्थितांना नियमित योगाभ्यासाचे शारीरिक व मानसिक लाभ समजावून सांगितले.
विशेष म्हणजे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामार्फत योग शिक्षकाचे प्रशिक्षण पूर्ण
केलेल्या चार बंदींनी या वेळी कारागृहातील इतर बंदींचा योगाभ्यास करुन घेतला. या उपक्रमामुळे
बंद्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
योग सत्रानंतर अॅड. विक्रांत मारोडकर
यांनी बंद्यांना कायदेविषयक माहिती दिली. त्यांनी राष्ट्रीय व राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या
विविध योजनांची माहिती देत बंद्यांचे समुपदेशन केले.
000
Comments
Post a Comment