वेळीच करा पैसा वाणी किडीचे नियंत्रण; कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला
वेळीच करा पैसा वाणी किडीचे नियंत्रण; कृषी विज्ञान केंद्राचा सल्ला
बुलडाणा, दि. 11 (जिमाका): जिल्ह्यातील सोयाबीन आणि इतर खरीप पिकांवर पैसा वाणी
अ-कीटक वर्गीय किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्याचे कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांनी
स्पष्ट केले आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य उपाययोजना
करण्याचे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ प्रवीण देशपांडे व वरिष्ठ शास्त्रज्ञ
तथा प्रमुख डॉ. ए. एस. झापे यांनी केले आहे.
पैसा
वाणी ही एक निशाचर कीड असून सामान्यतः सडणारी पाने, तसेच काडीकचरा, कुजणाऱ्या वनस्पती
इत्यादी पदार्थांना खाऊन उपजीविका करत असते जेव्हा यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते
तेव्हा ते जमिनीवर संपर्कात येणाऱ्या रोपावस्थेतील पिकांना खाऊन नुकसान करतात जमिनीलगत
रोपे कोरतडून टाकतात. कालांतराने रोपांवर जाऊन पानेसुद्धा कुरतडतात यामुळे रोपांची
संख्या कमी होऊन दुबार पेरणीची सुद्धावेळ येऊ शकते. या किडीच्या वाढीसाठी जमिनीत आद्रता
असणे आवश्यक आहे. त्यामुळे पावसाळ्यात किंवा जिथे ओलीताची सोय अशा ठिकाणी ही किड जास्त सक्रिय असते. त्यामुळे खालील प्रमाणे उपयायोजना कराव्यात.
नियंत्रणासाठी
उपयायोजना: कृषी विज्ञान केंद्राने दिलेल्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी शेतातील पालापाचोळा
व कुजलेला कचरा गोळा करून नष्ट करावा. रात्री गवताचे ढिग ठेवून सकाळी त्याखाली जमा
झालेली वाणी साबण किंवा मिठाच्या द्रावणात टाकून नष्ट करावीत. बांधावरील गवत, दगड हटवून
बांध मोकळा ठेवावा व शेतातील आर्द्रता कमी ठेवावी. वेळोवेळी कोळपणी करून जमिनीत लपलेल्या
किडी व अंडी उघड्यावर आणावीत. पिक उगवल्यानंतर पैसा वाणीचा प्रादुर्भाव दिसल्यास क्लोरोपारीफॉस
20 टक्के घटकयुक्त कीटकनाशक 37.5 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पंपाचे नोझल ढिले
करून रोपांभोवती वर्तुळाकार किंवा सरळ ओळीत आळवणी करावी 1 एकर क्षेत्रात 40 पंपाचे
ड्रिंचेंग करावे.
Comments
Post a Comment