आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कोलवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह कोलवड येथे प्रवेश प्रक्रिया सुरु
बुलढाणा,दि. १ (जिमाका) : एकात्मिक आदिवासी विकास
प्रकल्प, अकोला अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोलवड
जि. बुलढाणा येथे शैक्षणिक सत्र २०२५-२६ करीता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. बुलढाणा
जिल्ह्यातील तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यांतील पात्र व इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन
अर्ज करण्याचे आवाहन गृहपाल एस.एस. चौरपगार यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांनी २५ जून २०२५ ते १० जुलै २०२५ या
कालावधीत https://swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह मुदतीत वसतिगृह कार्यालयात प्रत्यक्ष सादर करणे
आवश्यक आहे. अर्ज भरतानाच्या सूचनानुसार अर्जात स्वतःचा मोबाईल क्रमांक नोंदवावा. मोबाईल
क्रमांक आधार व बँक खात्याशी जोडलेला असावा. नावाची नोंदणी करताना आधारकार्डवरील नावासारखेच
तंतोतंत भरावे. अर्जासोबत पालक व विद्यार्थ्यांचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक. त्याचा
नमुना संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे :
o उत्पन्नाचा
दाखला
o जातीचा
दाखला
o आधारकार्ड
o शेवटच्या
वर्षाची गुणपत्रिका
o बोनाफाईड/प्रवेशाची
मूळ पावती
o बँक
पासबुक
o दोन
पासपोर्ट फोटो
विद्यार्थ्यांनी व पालकांनी अर्ज भरताना सर्व माहिती
अचूक व स्पष्ट भरावी. कोणतीही चुकीची माहिती भरल्यास प्रवेश अर्ज अमान्य ठरू शकतो.
पात्र अभ्यासक्रम:
कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी / पदविका, व्यावसायिक
अभ्यासक्रम
या वसतिगृहात प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना निवास,
भोजन, अभ्यासासाठी योग्य वातावरण यासह विविध शासकीय सुविधांचा लाभ मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी व अर्ज प्रक्रिया मार्गदर्शनासाठी
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, कोलवड, तालुका
व जिल्हा बुलढाणा येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
00000
Comments
Post a Comment