मोताळा तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ जुलैला

 

मोताळा तालुक्यातील  ६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत ८ जुलैला

बुलढाणा,दि. १ (जिमाका) : ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक ५ मार्च च्या अधिसूचनेनुसार, मोताळा तालुक्यातील एकूण ६५ ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियमामधील तरतुदींनुसार हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याच्या दृष्टीने होणार आहे.

आरक्षण सोडतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध समाजघटकांचे सशक्तीकरण आणि प्रतिनिधित्व सुनिश्चित होणार आहे.

सदर आरक्षण सोडत दि ८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार असून, मोताळा तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार, मोताळा यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

स्वयं अर्थसहाय्यिता नवीन शाळांना मान्यता व दर्जावाढीची शिफारस; हरकती मागविल्या