Wednesday 22 June 2022

DIO BULDANA NEWS 22.6.22

 जिल्ह्यात 25 जून ते 1 जुलै कृषि संजीवनी मोहिम राबविणार

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उपक्रम  
         बुलडाणा, दि. 22 (जिमाका): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत 25 जून ते 1 जुलै 2022 या कालावधीत कृषि संजीवनी  मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची सांगता 1 जुलै 2022 रोजी स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हा कालावधी खरीप पिकांच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने या कालावधीत मोहिमेद्वारे कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि मित्र तसेच प्रगतशील शेतकरी शेतकऱ्यांचे बांधावर जावून नवीन तंत्रज्ञानाचा प्रचार, प्रसार व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
  या मोहिमेत 25 जून रोजी विविध पिकांचे तंत्रज्ञान प्रसार, मूल्यसाखळी बळकटीकरण दिन, 26 जून रोजी पौष्टीक तृणधान्य दिन, 27 जून रोजी महिला कृषि तंत्रज्ञान सक्षमीकरण दिन, 28 जून रोजी खत बचत दिन, 29 जून रोजी प्रगतीशील शेतकरी संवाद दिन, 30 जून रोजी शेतीपूरक व्यवसाय तंत्रज्ञान दिवस व 1 जुलै रोजी कृषि दिन साजरा करण्यात येणार आहे. तरी सदर कृषि संजीवनी मोहिमेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.
******   
डासांमार्फत होणारे आजार दूर करण्याकरीता आरोग्य विभाग सज्ज
डेंग्यू, मलेरीया विषयी कंटेनर सर्वेक्षण सुरू 
हिवताप प्रतिरोध महिन्यातंर्गत विविध उपक्रमांचे आयोजन
         बुलडाणा, दि. 22 (जिमाका): आरोग्य विभागामार्फत जून महिला हा हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महिन्यातंर्गत विविध हिवताप नियंत्रण व जनजागृतीच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार घरोघरी डेंगू, मलेरीया विषयी कंटेनर सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जावून माहिती पत्रकांच्या माध्यमातून डास अळी सर्वेक्षण, गप्पी मासे सोडणे आदींविषयी जनजागृती करीत आहे. पावसाळा सुरू झाला असून डासांची पैदास होवून आजार पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे डासांमार्फत होणारे आजार दूर करण्याकरीता आरोग्य विभाग सज्ज आहे. 
  विशेष डासामार्फत प्रसारीत होणारे हत्तीरोग, डेंगू, चिकनगुणीया, मलेरीया या रोगांच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग कार्य करीत आहे. डेंगू आजारावर निश्चित औषधोपचार नसल्यामुळे व हा रोग जिवघेणा असल्यामुळे त्यावर प्रतिबंधत्मक उपाययोजना राबविणे हा एकच योग्य मार्ग आहे. त्यामुळे या रोगांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.  या उपक्रमातंर्गत आशांना रक्त नमुना घेणे, कंटेनर सर्वेक्षण करणे, डास उत्पत्ती स्थाने शोधणे, गप्पी मासे सोडणे, संडासच्या गॅस पाईपला जाळ्या बसविणे या विषयी प्रशिक्षीत करण्यात येत आहे. 
  तसेच त्यांच्यामार्फत हस्त पत्रिकांचे वाटपही करण्यात येत आहे. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा हिवताप अधिकारी शिवराज चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. सदर मोहिमेत आरोग्य सहाय्यक श्री. पाखरे, श्री. जाधव, आरोग्य सेवक जी.एन साळोक, श्री. काकडे, श्री. वनारे, श्री. पडोळकर, एल.एस साळोक यांनी सहभाग घेतला.  
नागरिकांना आवाहन
 नागरीकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, अंगभर कपडे घालावे, दाराला व खिडक्यांना जाळ्या बसवाव्या, डास चावणार नाही अशा साधनांचा वापर करावा, डास उत्पत्ती साधने नष्ट करावीत, एक दिवस कोरडा पाळावा व ताप असल्यास रूग्णालयाशी संपर्क करावा, भंगार साहित्य, कुलर्स, टायर्स, नारळाच्या कवट्या, प्लॅस्टीकची तुटलेली भांडी, गाडगे, मडके सर्व नष्ट करावे. 
*********

आजी व माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती गठीत
         बुलडाणा, दि. 22 (जिमाका): माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा स्तरावर शासन निर्णयानुसार दोन समित्या गठीत करण्यात आल्या आहे. आजी व माजी सैनिकांनी अशासकीय सदस्यांना भेटून त्यांच्या माध्यमातून संबंधित कार्यालय प्रमुखांकडून आपल्या समस्यांचे निवारण करावे. त्यापूर्वी आपला अर्ज जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे नावाने सादर करावा.  जिल्हा स्तरावर पोलीस संरक्षण समितीमध्ये 13 तालुक्याचे सदस्य व जिल्हा सैनिक मंडळाच्या समितीचे 10 अशासकीय सदस्य आहे. या समिती सदस्यांच्या माध्यमातून तालुका व जिल्हा स्तरावर समस्यांचा निपटारा करण्यात यावा. जिल्हा सैनिक मंडळाच्या सदस्यांनी दोन फोटो ओळखपत्रासाठी कार्यालयात त्वरित जमा करावे.  जिल्हा पोलीस संरक्षण समितीमध्ये तालुकानिहाय अशासकीय सदस्यांची नावे व मोबाईल क्रमांक : बुलडाणा तालुक्यात हिम्मतराव रामराव उबरहंडे यांचा मोबाईल क्रमांक 9637389094, चिखली तालुका अशोक त्र्यंबक भुतेकर यांचा मोबाईल क्रमांक 6005820312, मेहकर तालुका सुभाष जयराम इंगळे यांचा मोबाईल क्रमांक 9421467100, लोणार तालुका भानुदास गोडसे यांचा मोबाईल क्रमांक 9527007122, दे.राजा तालुका दत्तात्रय रंगनाथ जाधव यांचा मोबाईल क्रमांक 9284052877, सिं.राजा तालुका फकीरा जाधव यांचा मोबाईल क्रमांक 9075585887, नांदुरा तालुका जी.एच बघाडे यांचा मोबाईल क्रमांक 7798701246,  खामगांव तालुका संजय भाऊराव ससाणे यांचा मोबाईल क्रमांक 7498629645, शेगांव तालुका विष्णू पहुरकर यांचा मोबाईल क्रमांक 8308073239, मोताळा तालुका सदाशिव घाटे यांचा मोबाईल क्रमांक 9421090070, मलकापूर तालुका गोपाल दवंगे यांचा मोबाईल क्रमांक 7350916408, संग्रामपूर तालुका भास्कर मालोकार यांचा मोबाईल क्रमांक 9423236744 आणि जळगांव जामोद तालुका निरंजन सावळे यांचा मोबाईल क्रमांक 9767036893 आहे. 
  जिल्हा सैनिक मंडळ समिती अशासकीय सदस्य नावे व पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष सिताराम सोनुने, सदस्य सर्वश्री ॲड प्रविण सुरडकर, सौ. दिपाली देशमुख, सुखदेव सुखदाणे, अनिल देशमुख, दिवाकर खोड, पुंजाजी इंगळे, अर्जुन गवई, नितीन राजपूत व विश्वनाथ गायकवाड.  तरी तालुका व जिल्हा स्तरावर सदर समितीच्या माध्यमातून आजी व माजी सैनिकांनी समस्यांचा निपटारा करावा, असे सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment