Tuesday 14 June 2022

DIO BULDANA NEWS 14.6.2022

 टंकलेखन, संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांची यादी प्रसिद्ध

  • अधिकृत संस्थेतच विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : जिल्ह्यातील टंकलेखन, संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शासनाकडून मान्यता देण्यात येते. तसेच सदर परीक्षा महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत त्याच जिल्ह्यात घेतल्या जातात.  प्रवेश घेण्यापूर्वी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेकडे ई-प्रमाणपत्र आहे किंवा नाही याची खात्री करूनच विद्यार्थ्यांनी सदर संस्थेत प्रवेश घ्यावा. जिल्ह्यात अशा अधिकृत मान्यता प्राप्त संस्थोची यादी mscepune.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

     जिल्ह्यात काही अवैधरित्या प्रवेश देऊन पालकांची व विद्यार्थ्यांची संस्थेकडून दिशाभूल केल्या जात असल्याची बाब मान्यता प्राप्त संस्था चालकांच्या संघटनेने निदर्शनास आणली आहे. जिल्ह्यात अनधिकृत संस्था आढळल्यास त्यांच्या विरूद्ध शासन नियमाप्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घेण्यात यावी, असे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

**********

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी 20 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : दरवर्षी शिक्षक दिनानिमित्ताने प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने सन 2022 च्या शिक्षक पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार https //nationalawardstoteacher.education.gov.in या वेबपोर्टलवर नाव नोंदणी सुरू झाली असून या पोर्टलवर इच्छूकांनी 20 जूनपर्यंत नाव नोंदणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रकाश मुकूंद यांनी केले आहे.

                                                                                                **********

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावा

बुलडाणा,(जिमाका) दि.14 : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ससादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर साधारणत: 3 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. तरी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही. त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरित अर्ज सादर करावा. 

   जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये व समितीस पुरेसा वेळ मिळावा यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मनोज मेरत यांनी केले आहे.   

No comments:

Post a Comment